'या' कारणाने कॅनडातील फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील बातम्या मेटानं हटवल्या, शेअरींगही केली बंद

मेटानं घेतलेल्या निर्णयामुळे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर बातम्या वाचण्यासाठी येणाऱ्या युजर्सना मोठा धक्का बसला आहे
'या' कारणाने कॅनडातील फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील बातम्या मेटानं हटवल्या, शेअरींगही केली बंद
Published on

मेटानं एक मोठा निर्यण घेत फेसबुक आणि इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का दिला आहे. कॅनडातील फेसबुक आणि इन्स्टाग्राम युजर्स दोन्ही प्लॅटफॉर्मवर बातम्या किंवा लिंक पाहू शकणार नाहीत. आजच्या युगात सोशल मीडियाने महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. सोशल मीडिया योग्य वापर हा फायद्याचाच आहे. अनेक जण याचा उपयोग फक्त मनोरंजनासाठी नाही तर माहिती मिळवण्यासाठी, माहितीचं अदान प्रदान करण्यासाठी करतात. मात्र आता मेटानं कॅनडात एक मोठा निर्णय घेतला आहे.

जगात अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असले तरीही फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे एक उत्तर उदाहरण आहे. या माध्यामातून अनेकांपर्यंत बातम्या पोहचण्याचं काम केलं जात होतं. अशात मेटानं घेतलेल्या निर्णयामुळे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर बातम्या वाचण्यासाठी येणाऱ्या युजर्सना मोठा धक्का बसला आहे. मेटानं कॅनडातील फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या बातम्या ब्लॉक केल्या आहेत. तसंच बातम्यांच्या लिंक हटवायला सुरुवात केली आहे. यापूढे कॅनडात फेसबुक आणि इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवर बातम्या न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे घेतला निर्णय

सोशल मीडिया कंपन्यांना बातम्यांच्या बदल्यात वृत्त प्रकाशकांना पैसे द्यावे लागतील असा कायदा कॅनडात करण्यात आला आहे. या कायद्याच्या निषेधार्थ मेटाने हा निर्णय घेतला आहे. कॅनडात केलेला कायदा हा फेसबुक, गुगल आणि ट्विटरसह सर्व सोशल मीडिया कंपन्यांना लागू होणार आहे. गुगलने देखील असाच इशारा दिला आहे.

मेटानं दिलेल्या निवेदनानुसार त्यांनी फेसबूक आणि इन्स्टाग्रावर शेअर केलेल्या बातम्यांच्या लिंक ब्लॉक करण्यात सुरुवात करण्यात आली आहे. यापुढे कॅनडातील युजर्सना बातम्यांच्या लिंक पाहता येणार नाहीत.

logo
marathi.freepressjournal.in