पाकचे माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना अटक

कोणतेही गैरकृत्य केले नसल्याचा इन्कार केला आहे
पाकचे माजी परराष्ट्र मंत्री  शाह मेहमूद कुरेशी यांना अटक
Published on

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे उपाध्यक्ष शाह मेहमूद कुरेशी यांना शनिवारी अटक करण्यात आली. फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एफआयए) कुरेशी यांना इस्लामाबादमधील त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले आहे. इम्रान खान यांना सत्तेवरून हटवण्याच्या उद्देशाने ही अटक करण्यात आल्याचा आरोप पीटीआय पक्षाकडून करण्यात आला.

पीटीआय पक्षाचे प्रवक्ते झुल्फी बुखारी यांनी सांगितले की, “दोन वेळा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री राहिलेल्या कुरेशी यांना ताब्यात घेण्याचे विशिष्ट कारण लगेच स्पष्ट झाले नाही. लवकरच एक पत्रकार परिषद घेऊन आणि सध्या पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या सर्व अत्याचार आणि मतदानपूर्व हेराफेरीच्या विरोधात पीटीआय पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात येईल.”

पीटीआय पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरल्यानंतर तीन वर्षांच्या तुरुंगवासात आहेत, तसेच त्यांना पाच वर्षांपर्यंत कोणतीही निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र इम्रान खान यांनी कोणतेही गैरकृत्य केले नसल्याचा इन्कार केला आहे. इम्रान खान यांनी २०१८ मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर आणि २०२२ पर्यंत अविश्वास ठराव होईपर्यंत ते पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी होते.

logo
marathi.freepressjournal.in