गाझात माजी भारतीय लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू

संयुक्त राष्ट्रांसाठी गाझा पट्टीत काम करणारे भारतीय लष्कराचे माजी अधिकारी वैभव अनिल काळे यांचा राफा येथे मृत्यू झाला आहे.
गाझात माजी भारतीय लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांसाठी गाझा पट्टीत काम करणारे भारतीय लष्कराचे माजी अधिकारी वैभव अनिल काळे (४६) यांचा राफा येथे मृत्यू झाला आहे. काळे हे पुणे येथील रहिवासी आहेत. त्यांच्यामागे पत्नी अमृता व दोन मुले आहेत.

काळे यांच्या निधनाची गंभीर दखल संयुक्त राष्ट्रांनी घेतली असून, काळे यांच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश संयुक्त राष्ट्रे व इस्त्रायल यांनी स्वतंत्रपणे दिले आहेत.

भारतीय लष्करातून निवृत्ती पत्करल्यानंतर कर्नल वैभव काळे हे संयुक्त राष्ट्रांचे सुरक्षा समन्वयक अधिकारी म्हणून २०२२ मध्ये रुजू झाले. काळे यांनी ११ जम्मू आणि काश्मीर रायफल्सचे नेतृत्व केलेले आहे. काळे हे राफा येथील युरोपियन रुग्णालयात दुसऱ्या कर्मचाऱ्यासोबत निघाले होते. तेव्हा त्यांचे वाहन दुसऱ्या वाहनाला धडकले. या दुर्घटनेत दुसरी व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.

पुण्यात होणार अंत्यसंस्कार

काळे हे तीन आठवड्यापूर्वीच संयुक्त राष्ट्रांचे सुरक्षा समन्वयक म्हणून सेवेत दाखल झाले होते. त्यांच्या पार्थिवावर दोन दिवसांनी पुण्यात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in