Former ISI chief Faiz Hameed
आयएसआयचे माजी प्रमुख फैज हमीद यांना अटक

पाकिस्तान: ISI च्या माजी प्रमुखाला लष्कराने केली अटक; कोर्ट मार्शलची कारवाई होणार

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचे माजी प्रमुख फैज हमीद यांना सोमवारी लष्कराने अटक केली असून त्यांच्याविरोधात कोर्ट मार्शलची कारवाई होणार आहे.
Published on

इस्लामाबाद : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचे माजी प्रमुख फैज हमीद यांना सोमवारी लष्कराने अटक केली असून त्यांच्याविरोधात कोर्ट मार्शलची कारवाई होणार आहे.

पाकिस्तान इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशनने सांगितले की, फैज हमीद यांना सैन्याने अटक केली. शहर गृहनिर्माण घोटाळ्याप्रकरणी त्यांच्याविरोधात कोर्ट मार्शलची प्रक्रिया सुरू केली. पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, माजी लेफ्टनंट जनरल हमीद यांच्याविरोधात गृहनिर्माण घोटाळ्याच्या तपास करणारे लष्कराचे पथक गेले होते. त्यात फैज हमीद यांच्या विरोधात अनेक प्रकरणे समोर आली.

फैज हमीद हे निवृत्त झाल्यानंतर पाकिस्तानी लष्कराच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे अनेक प्रकरणे उघडकीस आली. त्यामुळे निवृत्त हमीद यांच्याविरोधात अनेक अनुशासनात्मक कारवाई सुरू झाली. सध्या फील्ड जनरल कोर्ट मार्शलची प्रक्रिया सुरू झाली. पाकिस्तानच्या माजी गुप्तचर प्रमुखाविरोधात कोर्ट मार्शलची कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

logo
marathi.freepressjournal.in