
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्याला इस्लामाबादमध्ये अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद न्यायालयाबाहेर अटक करण्यात आली आहे. इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते चीमा यांनी ट्विट केले की, अटक करणारे सुरक्षा अधिकारी इम्रान खानचा छळ करत असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
पीटीआयने ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये इम्रान खानचे वकील जखमी अवस्थेत दिसत आहेत. इम्रान खानच्या अटकेनंतर इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली. अटक करताना न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. इम्रान खानला न्यायालयात दाखल करण्यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.