ऑस्ट्रेलियातील फिलिप बेटावर चार भारतीय बुडाले

कॅनबेरामधील भारतीय उच्चायुक्तांनी एक्सवर पोस्ट करून दु:ख व्यक्त केले आहे.
ऑस्ट्रेलियातील फिलिप बेटावर चार भारतीय बुडाले

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यात सुरक्षारक्षक तैनात नसलेल्या फिलिप बेटावरील बीचवर दोन महिलांसह चार भारतीयांचा बुडून मृत्यू झाला. गेल्या २० वर्षांतील ही भीषण दुर्घटना आहे. ही घटना बुधवारी घडली. आपत्कालीन व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. बुधवारी दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली. नंतर एका ड्युटीवर नसलेल्या लार्इफगार्डने या चारही जणांना ओढून बाहेर काढले. यात एक पुरुष आणि दोन स्त्रिया जागीच मृत झाल्या होत्या, तर तिसरी महिला २० वर्षांची तरुणी मेलबर्नमधील आल्फर्ड रुग्णालयात मृत झाल्याचे जाहीर करण्यात आले. तेथील प्रशासनाने मृतांची नावे व तपशील जाहीर केलेला नाही. दरम्यान, कॅनबेरामधील भारतीय उच्चायुक्तांनी एक्सवर पोस्ट करून दु:ख व्यक्त केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in