भारत आणि ब्रिटनमधील मुक्त व्यापार करार दिवाळीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता

भारत आणि ब्रिटनमधील मुक्त व्यापार करार दिवाळीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता

भारत आणि ब्रिटनमधील मुक्त व्यापार करार दिवाळीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. जर सर्व काही ठीक झाले तर पुढील दिवाळीपर्यंत मुक्त व्यापार करार (एफटीए) अस्तित्वात येईल, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. गोयल सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, यूकेमध्ये सुरू असलेल्या ९९ प्रकल्पांमध्ये भारतीय कंपन्यांची गुंतवणूक आहे.

विशेष म्हणजे, दावोसमध्ये डब्ल्यूईएफच्या वार्षिक बैठकीत सहभागी झाल्यानंतर पियुष गोयल लंडनमध्ये पोहोचले आहेत. ते म्हणाले की, भारत आणि ब्रिटनमध्ये ज्या प्रकारे चर्चा सुरू आहे, ते पाहता दिवाळीपर्यंत दोन्ही देशांमधील एफटीए तयार होईल, असे म्हणता येईल. जे संकेत मिळत आहेत त्यानुसार सर्व काही योग्य दिशेने सुरू आहे. यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी ऑस्ट्रेलिया आणि यूएईसोबत सुरू असलेल्या एफटीएचाही उल्लेख केला. अलीकडेच, भारतादरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, दोन्ही देशांचे संघ मुक्त व्यापार करारावर (एफटीए) काम करत आहेत आणि चर्चेत प्रगती होत आहे. आम्ही या वर्षाच्या अखेरीस एफटीए पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आम्ही दोघांनीही मुक्त व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आग्रह धरला असल्याचे जॉन्सन यांनी सांगितले. ते दिवाळीपर्यंत पूर्ण व्हावे, असे बोरिस जॉन्सन म्हणाले. यूके हा भारतातील १५ वा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे.२०२०च्या आकडेवारीवर नजर टाकली तर दोन्ही देशांमध्ये एकूण १८.३ अब्ज पौंडचा व्यापार झाला होता.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in