इराणचे अध्यक्ष रईसी यांच्यावर अंत्यसंस्कार; अयातुल्ला अली खामेनी यांच्याकडून आदरांजली

हेलिकॉप्टर अपघातात निधन झालेले इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी, परराष्ट्रमंत्री हुसेन अमीरअब्दुल्लाहियन आणि अन्य सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर...
इराणचे अध्यक्ष रईसी यांच्यावर अंत्यसंस्कार; अयातुल्ला अली खामेनी यांच्याकडून आदरांजली
छायाचित्र सौजन्य - पीटीआय

तेहरान : हेलिकॉप्टर अपघातात निधन झालेले इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी, परराष्ट्रमंत्री हुसेन अमीरअब्दुल्लाहियन आणि अन्य सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर बुधवारी इरामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी तेहरान विद्यापीठाच्या आवारात आयोजित केलेल्या शोकसभेला मोठ्या प्रमणात गर्दी जमली होती. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी हे या क्रायक्रमाचे अध्यक्ष होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक देशांच्या प्रतिनिधींसह इराणी जनतेने दिवंगत नेत्यांना अखेरचा निरोप दिला.

दिवंगत नेत्यांचे ताबूत इराणी राष्ट्रध्वजामध्ये लपेटले होते. अयातुल्ला अली खामेनी यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना म्हटली. इराणचे कार्यवाहक अध्यक्ष मोहम्मद मोख्बर यावेळी त्यांच्याजवळ उपस्थित होते. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डचे प्रमुख नेते उपस्थित होते. तसेच गाझा पट्टीतील हमास या संघटनेचे नेता इस्माईल हनिये हादेखील हजर होता.

logo
marathi.freepressjournal.in