जी-७ गटाची इस्रायल-हमास युद्धावर भूमिका जाहीर - हमासच्या हल्ल्याचा निषेध, इस्रायलच्या स्व-संरक्षणाच्या अधिकाराचे समर्थन

गाझा पट्टीतील पीडित नागरिकांना त्वरित मदत करण्यासाठी युद्धात मानवतावादी विरामाचे आवाहन केले.
जी-७ गटाची इस्रायल-हमास युद्धावर भूमिका जाहीर - हमासच्या हल्ल्याचा निषेध, इस्रायलच्या स्व-संरक्षणाच्या अधिकाराचे समर्थन

टोकियो : सात प्रमुख औद्योगिक लोकशाही देशांच्या जी-७ या संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांनी टोकियोमध्ये भरलेल्या बैठकीनंतर बुधवारी इस्रायल-हमास युद्धावर एकसंध भूमिका जाहीर केली. त्यात हमासच्या हल्ल्याचा निषेध केला आणि इस्रायलच्या स्व-संरक्षणाच्या अधिकाराचे समर्थन केले. तसेच गाझा पट्टीतील पीडित नागरिकांना त्वरित मदत करण्यासाठी युद्धात मानवतावादी विरामाचे आवाहन केले.

दोन दिवसांच्या चर्चेनंतर जाहीर केलेल्या निवेदनात जी-७ संघटनेने इस्रायलवरील हमासच्या हल्ल्याबाबत निःसंदिग्ध टीका केली आणि वेढलेल्या गाझातील नागरिकांना मदत करण्यासाठी तात्काळ कारवाईची आवश्यकता व्यक्त केली. सर्व देशांनी गाझा पट्टीत अन्न, पाणी, वैद्यकीय सेवा, इंधन आणि मानवतावादी कर्मचाऱ्यांसाठी प्रवेश याला परवानगी दिली पाहिजे, अशी भूमिका अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन यांच्यासह ब्रिटन, कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मांडली. फ्रान्स, जर्मनी, जपान आणि इटली यांच्या प्रतिनिधींनी तात्काळ आवश्यक मदत आणि ओलीसांची सुटका करण्यासाठी मानवतावादी विराम आणि सुरक्षित कॉरिडॉरचे समर्थन केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in