भारत-मध्यपूर्व-युरोपियन आर्थिक मार्गिकेच्या अंमलबजावणीसाठी ‘जी-७’ कटिबद्ध

भारत-मध्यपूर्व-युरोपियन आर्थिक मार्गिकेच्या अंमलबजावणीसाठी ‘जी-७’ गट कटिबद्ध असल्याचे जाहीर करण्यात आले. इटलीतील ‘जी-७’ राष्ट्रांच्या शिखर परिषदेची सांगता झाली. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते.
भारत-मध्यपूर्व-युरोपियन आर्थिक मार्गिकेच्या अंमलबजावणीसाठी ‘जी-७’ कटिबद्ध
PTI
Published on

बारी (इटली) : भारत-मध्यपूर्व-युरोपियन आर्थिक मार्गिकेच्या अंमलबजावणीसाठी ‘जी-७’ गट कटिबद्ध असल्याचे जाहीर करण्यात आले. इटलीतील ‘जी-७’ राष्ट्रांच्या शिखर परिषदेची सांगता झाली. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते.

या परिषदेच्या सांगता समारंभानंतर जारी केलेल्या वृत्तानुसार, जी-७ जागतिक पायाभूत व गुंतवणूक भागीदारी अधिक भक्कम केली जाणार आहे. यात अनेक महत्वाच्या प्रकल्पांना गती देऊन आर्थिक मार्गिकेत केले जाईल. या अंतर्गत दर्जेदार पायाभूत सुविधा उभारल्या जातील. रेल्वे रोड, नौकानयन नेटवर्क उभारले जाईल. यात भारत, सौदी अरेबिया, युरोप यांचा समावेश असेल. हे नेटवर्क आशिया-मध्य पूर्व व पाश्चिमात्य देशांना जोडेल. चीनच्या ‘बीआरआय’ प्रकल्पाला तोडीस तोड म्हणून भारत-मध्यपूर्व-युरोपियन आर्थिक मार्गिका उभारली जाणार आहे.

कारण चीनच्या ‘बीआरआय’ प्रकल्पात पारदर्शकता नसल्याची टीका होत असून अनेक देशांच्या सार्वभौमत्वाला त्यामुळे धक्का लागणार आहे. चीनच्या ‘बीआरआय’ प्रकल्पाद्वारे चीन हा दक्षिण-आशिया देश, मध्य आशिया, रशिया व युरोपला जोडणार आहे. त्याला तोडीस तोड म्हणून गेल्यावर्षी जी-२० शिखर परिषदेत ‘भारत-मध्यपूर्व-युरोपियन आर्थिक मार्गिके’चा प्रस्ताव तयार केला.

या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, ऊर्जा, आफ्रिका व मध्यपूर्व आदी विषयांवर भारताची भूमिका मांडली.

मोदी मायदेशी रवाना

‘जी-७’ परिषद संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इटलीहून भारताकडे रवाना झाले आहेत. मोदी यांनी या परिषदेत फ्रान्सचे अध्यक्ष, ब्रिटनचे पंतप्रधान, युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की व पोप फ्रान्सीस यांची भेट घेतली.

logo
marathi.freepressjournal.in