लंडनमध्ये म. गांधींजींच्या पुतळ्याची तोडफोड; भारतीय उच्चायुक्तालयाकडून घटनेचा निषेध

लंडनच्या टॅविस्टॉक स्क्वेअरवरील म. गांधीजींच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली असून, आज २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या वार्षिक गांधी जयंती समारंभाच्या काही दिवस आधी हा प्रकार घडला आहे.
लंडनमध्ये म. गांधींजींच्या पुतळ्याची तोडफोड
लंडनमध्ये म. गांधींजींच्या पुतळ्याची तोडफोड
Published on

 लंडन : लंडनच्या टॅविस्टॉक स्क्वेअरवरील म. गांधीजींच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आल्याची घटना आज घडली असून, २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या वार्षिक गांधी जयंती समारंभाच्या काही दिवस आधी हा प्रकार घडला आहे. पुतळ्याच्या पायथ्याशी प्रक्षोभक भित्तीचित्रे आढळली. या घटनेनंतर, भारतीय उच्चायुक्तालयाने या घटनेचा तीव्र निषेध केला.

 भारतीय दूतावासाने सांगितले की, स्थानिक अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

लंडनमधील हिंदुस्थानी उच्चायुक्तालयाने सोशल मीडियावरील निवेदनात म्हटले आहे की, टॅविस्टॉक स्क्वेअरवरील महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड झाल्याने लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाकडून दुःख व्यक्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनाच्या तीन दिवस आधी घटना घडली असून आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांकडे तातडीने कारवाईसाठी हा मुद्दा गांभीर्याने उपस्थित केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in