
तेल अवीव : गाझा शस्त्रसंधीनंतर ‘हमास’ने तीन अपहृत महिलांची नावे जाहीर केली. रोमी गोनेन, एमिली दमारी आणि डोरोन स्टीनब्रेचर यांची सुटका केली आहे, असे ‘हमास’ने जाहीर केले.
इस्रायलने सांगितले की, गाझा युद्धात स्थानीय वेळेनुसार, सकाळी ११.१५ वाजता शस्त्रसंधी सुरू झाली. मात्र, ही शस्त्रसंधी सकाळी ८.३० वाजता सुरू व्हायला हवी होती. ‘हमास’ने अपहृत नागरिकांची यादी देण्यास तीन तास विलंब केला आहे.
शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर युद्धक्षेत्रावर आनंदाचे वातावरण पसरले आहे. काही पॅलेस्टिनी नागरिक आपल्या घरी परतू लागले आहेत.
गाझावर इस्रायली सैन्याचे हल्ले
‘हमास’कडून शस्त्रसंधीस विलंब होत असल्याने इस्रायलने सकाळी गाझा पट्टीवर हल्ले सुरूच ठेवले. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझा पट्टीत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. इस्रायल सैन्यदलाचे प्रमुख प्रवक्ते डॅनियल हेगरी म्हणाले की, जोवर तीन अपहृत नागरिकांची यादी इस्रायलकडे सोपवत नाही. तोपर्यंत शस्त्रसंधी लागू होणार नाही.