फ्रान्समध्ये ३० हजार भारतीय विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट; फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची माहिती

भारतीय विद्यार्थ्यांना फ्रान्समध्ये आमंत्रित करणे ही योजना भारतासोबतचे फ्रान्सचे संबंध मजबूत करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रयत्नांचा एक भाग आहे
फ्रान्समध्ये ३० हजार भारतीय विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट; फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची माहिती

नवी दिल्ली : २०३० पर्यंत फ्रान्समधील विद्यापीठांमध्ये ३० हजार भारतीय विद्यार्थी असतील, असा विश्वास फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी व्यक्त केला. भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतात आले आहेत. भारतात येताच त्यांनी मोठे लक्ष्य जाहीर केले आहे.

इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी एक्सवर पोस्ट केली. भारतीय विद्यार्थ्यांना फ्रान्समध्ये आमंत्रित करणे ही योजना भारतासोबतचे फ्रान्सचे संबंध मजबूत करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रयत्नांचा एक भाग आहे, असे इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी म्हटलंय. जुलै २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यानंतर त्यांनी लक्ष्य जाहीर केले होते.

आम्ही सर्वांसाठी फ्रेंच, फ्रेंच फॉर अ बेटर फ्युचर या उपक्रमासह सार्वजनिक शाळांमध्ये फ्रेंच शिकण्यासाठी नवीन उपक्रम सुरू करत आहोत. आम्ही फ्रेंच शिकण्यासाठी नवीन केंद्रांसह नेटवर्क विकसित करत आहोत. आम्ही आंतरराष्ट्रीय वर्ग तयार करत आहोत. ज्या विद्द्यार्थ्यांना फ्रेंच भाषा येत नाही, त्यांना आमच्या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळू शकेल”, असं मॅक्रॉन म्हणाले. फ्रान्समध्ये शिकलेल्या माजी भारतीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसा प्रक्रिया सुव्यवस्थित केली जाणार आहे. जेणेकरून त्यांना फ्रान्समध्ये परतणं सोपं होईल. २०२५ पर्यंत २० हजार भारतीय विद्यार्थ्यांना प्रथम आकर्षित करण्याचे फ्रान्सचे उद्दिष्ट असून, २०३० पर्यंत ३० हजारच्या मोठ्या उद्दिष्ट असल्याचंही मॅक्रॉन यांनी सांगितलं. “हे एक अतिशय महत्वाकांक्षी लक्ष्य आहे, परंतु मी ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कटिबद्ध आहे,” मॅक्रॉन म्हणाले.

भारतीय विद्यार्थ्यांना फ्रान्समध्ये शिक्षण घेणे सोपे व्हावे यासाठी फ्रान्स सरकारने आधीच पावले उचलली आहेत. २०१८ मध्ये त्यांनी “कॅम्पस फ्रान्स” नावाचा एक कार्यक्रम सुरू केला होता. या कार्यक्रमातून फ्रान्समध्ये शिकण्यास इच्छुक असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना माहिती मिळू शकेल. फ्रान्समध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in