गोटाबाया राजपक्षे मालदीवमधून सिंगापूरला रवाना

संसद भवनाच्या सुरक्षेसाठी रणगाडे तैनात करण्यात आले असून लष्कराने राष्ट्रपती भवन व पंतप्रधान निवासस्थान आपल्या ताब्यात घेतले असून निदर्शकांना हुसकावून लावले
गोटाबाया राजपक्षे मालदीवमधून सिंगापूरला रवाना

श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे गुरुवारी मालदीवहून सिंगापूरला रवाना झाले आहेत. श्रीलंकेत आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. नागरिकांमधील संतापाने उग्र रुप धारण केल्याने आंदोलक थेट राष्ट्राध्यक्षांच्या सरकारी निवासस्थानात शिरले. त्यामुळे राजपक्षे यांनी श्रीलंकेतून पलायन केले आहे.

श्रीलंकेतील सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, “गोटाबाया राजपक्षे सिंगापूरमध्ये थांबणार आहेत. राजपक्षे यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे कबूल केले होते. मात्र, श्रीलंकेच्या संसद सभापतींना अद्याप राजपक्षे यांचा राजीनामा मिळालेला नाही. त्यामुळे श्रीलंकेतील सर्व पक्षांनी एकत्र येत सर्वपक्षीय सरकार स्थापनेच्या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.”

श्रीलंकेतून पळ काढलेल्या राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी आता मालदीवमधून सिंगापूरला पलायन केले आहे. ते एका खासगी विमानाने मालदीव बाहेर पडले. दुसरीकडे, कोलंबोत अजूनही निदर्शने सुरूच आहेत. यामुळे संसद भवनाच्या सुरक्षेसाठी रणगाडे तैनात करण्यात आले असून लष्कराने राष्ट्रपती भवन व पंतप्रधान निवासस्थान आपल्या ताब्यात घेतले असून निदर्शकांना हुसकावून लावले आहे.

राजपक्षेंनी बुधवारी रात्री मालदीवच्या व्हेलाना आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सिंगापूरला पलायन करण्याचा प्रयत्न केला. पण, मालदीवमधील श्रीलंकन नागरिकांच्या निदर्शनांमुळे त्यांना आपले विमान गाठता आले नाही. गोटबाया मंगळवारी रात्री कोलंबोहून मालदीवला पोहोचले होते. त्यांच्यासह त्यांची पत्नी व दोन अंगरक्षक होते. राजपक्षेंचे भाऊ बासिल यापूर्वीच अमेरिकेला पळाले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in