ग्रीनकार्ड म्हणजे अमेरिकेत राहण्याचा कायमचा परवाना नव्हे! अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांचे प्रतिपादन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रस्तावित केलेल्या ‘गोल्ड कार्ड’ म्हणजेच ग्रीनकार्ड मिळाले म्हणजे परकीय नागरिकांना अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्याचा तो परवाना नाही, असे प्रतिपादन अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी केले.
ग्रीनकार्ड म्हणजे अमेरिकेत राहण्याचा कायमचा परवाना नव्हे! अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांचे प्रतिपादन
Published on

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रस्तावित केलेल्या ‘गोल्ड कार्ड’ म्हणजेच ग्रीनकार्ड मिळाले म्हणजे परकीय नागरिकांना अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्याचा तो परवाना नाही, असे प्रतिपादन अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी केले.

गेल्याच महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुंतवणूकदारांसाठी ३५ वर्षे जुन्या व्हिसाऐवजी ५० लाख अमेरिकन डॉलरमध्ये ‘गोल्ड कार्ड’ची योजना जाहीर केली. ही कार्ड खरेदी करणारे नागरिक अमेरिकन नागरिकत्व स्वीकारण्यासाठी पात्र ठरतील. स्थायी नागरिकत्व देणाऱ्या व्हिसाला ‘ग्रीन कार्ड’ही म्हणतात. त्यामुळे भारतीयांसह अनेक परदेशी नागरिकांना अमेरिकेत राहण्याची व काम करण्याची परवानगी मिळते.

‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत उपाध्यक्ष व्हान्स म्हणाले की, स्थायी नागरिकत्व मिळाले तरीही परदेशी नागरिकांना सर्व सुविधा कायमस्वरूपी मिळू शकत नाहीत. ‘ग्रीन कार्ड’ म्हणजे परदेशी नागरिकांना अमेरिकेत अनिश्चित काळ राहण्याची मुभा नव्हे. देशाचे नागरिक म्हणून कोणाला राष्ट्रीयत्व द्यायचे याचा निर्णय घ्यायचा अधिकार अमेरिकेला आहे. परराष्ट्रमंत्री व राष्ट्राध्यक्ष ठरवतात की, कोणत्या व्यक्तीला अमेरिकेत ठेवायचे, कुणाला नाही. तसेच ज्याला कायदेशीर राहण्याचे अधिकार नसतील तर ते सहजपणे समोरच्याला समजले पाहिजे, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in