नोकरी गेल्यास अमेरिकेतून बाहेर; ६० दिवसांचा सवलतीचा कालावधी रद्द करण्याची तयारी, ट्रम्प प्रशासनाचा H-1B व्हिसाबाबत कठोर पवित्रा

अमेरिकेत एच-१बी व्हिसाच्या आधारे नोकरी करणाऱ्या कुशल आयटी व्यावसायिकांसाठी चिंताजनक बातमी आहे. नोकरी गेल्यानंतर नवीन काम शोधण्यासाठी मिळणारा ६० दिवसांचा सवलतीचा कालावधी रद्द करण्याचा नवा नियम अमेरिकेने प्रस्तावित केला आहे.
नोकरी गेल्यास अमेरिकेतून बाहेर; ६० दिवसांचा सवलतीचा कालावधी रद्द करण्याची तयारी, ट्रम्प प्रशासनाचा H-1B व्हिसाबाबत कठोर पवित्रा
Published on

वॉशिंग्टन : अमेरिकेत एच-१बी व्हिसाच्या आधारे नोकरी करणाऱ्या कुशल आयटी व्यावसायिकांसाठी चिंताजनक बातमी आहे. नोकरी गेल्यानंतर नवीन काम शोधण्यासाठी मिळणारा ६० दिवसांचा सवलतीचा कालावधी रद्द करण्याचा नवा नियम अमेरिकेने प्रस्तावित केला आहे. अमेरिकन सरकारच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका अमेरिकेत कार्यरत असलेल्या हजारो भारतीय तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.

अमेरिकन कंपन्यांना तांत्रिक किंवा विशेष ज्ञान आवश्यक असलेल्या कामांसाठी परदेशी कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्याची परवानगी एचवन बी व्हिसा योजनेतून मिळते. भारत आणि चीनसारख्या देशांमधून दरवर्षी हजारो कुशल कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवण्यासाठी अमेरिकेतील दिग्गज तंत्रज्ञान कंपन्या या व्हिसावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. या प्रस्तावामुळे व्हिसाधारक तसेच त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबीयांना मिळणारी ६० दिवसांची सवलत संपुष्टात येईल. जर हा नियम लागू झाला, तर नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना थेट देशाबाहेर काढण्यासाठी 'नोटीस टू अपिअर' जारी केली जाऊ शकते.

नवीन नियम लागू झाल्यास, नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना आधी अमेरिका सोडावी लागेल. त्यानंतर दुसऱ्या अमेरिकन कंपनीकडून ऑफर लेटर मिळाल्यावर तेथील दूतावासातून पुन्हा व्हिसासाठी अर्ज करावा लागेल.

अमेरिकन कायद्यानुसार दरवर्षी ६५,००० एच-१बी व्हिसा जारी केले जातात, तर अमेरिकन विद्यापीठांमधून उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी अतिरिक्त २०,००० व्हिसा राखीव असतात. डीएचएसच्या आकडेवारीनुसार, २०२१ ते २०२५ या काळात सुमारे ३.२८ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांची नोकरी सुटली किंवा त्यांनी कंपनी बदलली होती.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in