हमासची ओलिसांना ठार मारण्याची धमकी - इस्रायलकडून गाझातील हल्ले सुरूच

इस्रायल-हमास युद्धाला आता दोन महिने उलटून गेले आहेत. काही दिवसांपूर्वी कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थीनंतर सात दिवसांचा तात्पुरता युद्धविराम करण्यात आला.
हमासची ओलिसांना ठार मारण्याची धमकी
- इस्रायलकडून गाझातील हल्ले सुरूच
Published on

तेल अवीव : इस्रायलच्या तुरुंगांतील पॅलेस्टिनी नागरिकांना मुक्त करण्याविषयी मागण्या मान्य केल्या नाहीत तर एकही इस्रायली ओलीस गाझातून जिवंत परतणार नाही, अशी धमकी हमासने दिली आहे. त्यावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे की, हमासच्या अनेक दहशतवाद्यांनी शरणागती पत्करली असून हमासचा अंत जवळ आला आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांत मध्यस्थी करणाऱ्या कतारने म्हटले आहे की, यापुढे समझोत्याची शक्यता मावळत चालली आहे.

इस्रायल-हमास युद्धाला आता दोन महिने उलटून गेले आहेत. काही दिवसांपूर्वी कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थीनंतर सात दिवसांचा तात्पुरता युद्धविराम करण्यात आला. त्या काळात हमासने इस्रायलचे ५० आणि अन्य देशांचे काही ओलीस सोडले. तर इस्रायलने त्यांच्या तुरुंगात कैद असलेल्या १५० पॅलेस्टिनी नागरिकांची सुटका केली. हमासने एकू २४० इस्रायलयी ओलीस पकडले होते. तर इस्रायलच्या तुरुंगात जवळपास ६००० पॅलेस्टिनी कैदी आहेत. इस्रायलचे उर्वरित ओलीस सोडण्याच्या बदल्यात हमासने किमान तिप्पट पॅलेस्टिनींना मुक्त करण्याची मागणी केली होती. मात्र, तात्पुरत्या युद्धविरामानंतर इस्रालने पुन्हा युद्ध सुरू केले असल्याने आता पुन्हा युद्धविरामाची आणि पर्यायाने ओलिसांच्या अदलाबदलीची शक्यता संपत आली आहे. इस्रायलने गेल्या काही दिवसांत गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील खान युनूस शहरावर तुफानी हल्ले चढवले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in