'इबोला'च्या उद्रेकामुळे आरोग्य आणीबाणी घोषित; काँगो आणि युगांडामध्ये इबोलामुळे ८८ जणांचा मृत्यू

काँगो आणि शेजारील युगांडा देशात इबोला आजाराचा उद्रेक झाल्यामुळे ‘जागतिक आरोग्य संघटने’ने रविवारी आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.
'इबोला'च्या उद्रेकामुळे आरोग्य आणीबाणी घोषित; काँगो आणि युगांडामध्ये इबोलामुळे ८८ जणांचा मृत्यू
'इबोला'च्या उद्रेकामुळे आरोग्य आणीबाणी घोषित; काँगो आणि युगांडामध्ये इबोलामुळे ८८ जणांचा मृत्यू
Published on

अबूजा : काँगो आणि शेजारील युगांडा देशात इबोला आजाराचा उद्रेक झाल्यामुळे ‘जागतिक आरोग्य संघटने’ने रविवारी आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. या भागात इबोलाचे ३०० हून अधिक संशयित रुग्ण आढळले असून ८८ जणांचा मृत्यू झाला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी ही घोषणा केली. सोशल मीडिया मंच एक्सवरील एका पोस्टमध्ये संघटनेने स्पष्ट केले की, हा उद्रेक कोविड-१९ महामारीसारखा महामारी आणीबाणीच्या निकषांमध्ये बसत नाही, त्यामुळे आंतरराष्ट्रीय सीमा बंद न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

काँगोची राजधानी किनशासा येथे प्रयोगशाळेत तपासणी केलेला एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला असून हे ठिकाण पूर्वेकडील इतुरी प्रांतातील उद्रेकाच्या मुख्य केंद्रापासून सुमारे १,००० किलोमीटर दूर आहे. त्यामुळे हा संसर्ग अधिक वेगाने पसरत असल्याचे संकेत मिळत आहेत.

याशिवाय काँगोमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आणि इतुरी प्रांताच्या सीमेला लागून असलेल्या उत्तर किवू प्रांतातही इतर संशयित रुग्ण आढळले आहेत. इबोला अत्यंत संसर्गजन्य असून उलट्या, रक्त किंवा वीर्य यांसारख्या शरीरातील द्रवपदार्थांच्या संपर्कात आल्यास त्याचा संसर्ग होऊ शकतो.

logo
marathi.freepressjournal.in