असनी’ चक्रीवादळामुळे रविवारी अंदमान व निकोबार बेटांवर जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे सर्वसामान्य जीवन विस्कळीत झाले आहे. हे वादळ वेगाने या बेटांकडे वाटचाल करत आहे. यामुळे येथील जहाज वाहतूक थांबली असून मच्छीमारांना रोखले आहे. एनडीआरएफच्या पाच तुकडया तैनात केल्या आहेत.
खबरदारीचा उपाय म्हणून बेटाच्या विविध भागात सहा शिबीरे स्थापित केली आहेत. प्रवासी व अन्य नागरिकांसाठी हेल्पलाईन सुरू केली आहे.
‘असनी’ चक्रीवादळाने रविवारी अंदमानात प्रवेश केला आहे. मात्र, पोर्टब्लेअरमध्ये जनजीवन सामान्य आहे. प्रशासनाकडून सुरक्षेसाठी विशेष तयारी केली आहे.
मणिपुरात बिरेन सिंह पुन्हा मुख्यमंत्री
इंफाळ-मणिपूरममध्ये भाजप आमदारांच्या बैठकीत एन. बीरेन सिंह यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकमताने निवड झाली आहे. त्यामुळे लागोपाठ दुसऱ्यांदा बीरेन सिंह मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. भाजप आमदारांच्या बैठकीत केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण आणि किरेन रिजिजू पर्यवेक्षक म्हणून उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत सिंह यांची विधिमंडळाचे नेते म्हणून निवड झाली आहे.