नईम कासीम
नईम कासीमएक्स - (@yoavgallant)

नईम कासीम 'हिजबुल्ला 'चा नवा म्होरक्या; नसरल्लाहची धोरणे पुढे सुरू ठेवणार

कासीम हा दीर्घकाळापासून नसरल्लाहचा निकटचा साथीदार होता. नसरल्लाह मारला गेल्यानंतर कासीम आतापर्यंत दहशतवादी संघटनेचा प्रभारी म्होरक्या म्हणून काम पाहात होता.
Published on

बेरुत : लेबनॉनमधील 'हिजबुल्ला' या दहशतवादी संघटनेने नईम कासीम याची संघटनेचा नवा म्होरक्या म्हणून निवड केली आहे. इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात गेल्या महिन्यात 'हिजबुल्ला'चा म्होरक्या हसन नसरल्लाह मारला गेल्यानंतर आता कासीम हा या संघटनेचा नवा म्होरक्या असेल.

कासीम हा दीर्घकाळापासून नसरल्लाहचा निकटचा साथीदार होता. नसरल्लाह मारला गेल्यानंतर कासीम आतापर्यंत दहशतवादी संघटनेचा प्रभारी म्होरक्या म्हणून काम पाहात होता. 'शुरा कौन्सिल' या हिजबुल्लाच्या निर्णय प्रक्रिया समितीने कासीम याची दहशतवादी संघटनेच्या प्रमुखपदी निवड केली आहे.

नसरल्लाहची धोरणे पुढे सुरू ठेवणार

कासीम गेल्या तीन दशकांपासून नसरल्लाहचा जवळचा साथीदार म्हणून काम करीत होता. नसरल्लाहची धोरणे पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार कासीम याने व्यक्त केला आहे. विजय मिळेपर्यंत दहशतवादी संघटना नसरल्लाहची धोरणे राबवत राहील, असे कासीमने म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in