हिजबुल्लाहची अमेरिका आणि इस्रायलला इशारा पूर्वीपेक्षा आम्ही हजारपट मजबूत

हिजबुल्लाहची अमेरिका आणि इस्रायलला इशारा पूर्वीपेक्षा आम्ही हजारपट मजबूत

इस्त्रायलने गाझा पट्टीवर जमिनीवरून आक्रमण सुरू करऱ्याची तयारी केली आहे
Published on

तेल अवीव : हिजबुल्लाह ही संघटना पॅलेस्टाईनच्या बाजुने युद्धात उतरल्यास वाईट परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देणाऱ्या इस्त्रायलला हिजबुल्लानेच धमकी दिली आहे. आम्ही पूर्वीपेक्षा हजारपटींनी मजबूत झालो आहोत, हे अमेरिका आणि इस्त्रायलनेही लक्षात घ्यावे, असे हिजबुल्लाहने म्हटले आहे.

इस्त्रायलने गाझा पट्टीवर जमिनीवरून आक्रमण सुरू करऱ्याची तयारी केली आहे. गाझाच्या सीमेवर लष्कर सरकारच्या आदेशाची वाट पहात आहे. इस्त्रायली रणगाडे आणि चिलखती वाहनांवर बसवलेले सैन्य या प्रदेशात तैनात करण्यात आले आहे. हमासवर कोणत्याही क्षणी जमिनीवरून हल्ला सुरू होऊ शकतो. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो, असे हिजबुल्लाहने म्हटले आहे. इस्रायलने इजिप्तला गाझा पट्टीतील लोकांना मर्यादित मानवतावादी मदत देण्याची परवानगी दिली आहे. गाझातील हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्यानंतर तेथील वैद्यकीय वैद्यकीय यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. पाणी, अन्न आणि इतर पुरवठ्याला परवानगी देण्याची घोषणा गाझा शहरातील अल-अहली हॉस्पिटलमध्ये झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण मध्यपूर्वेला करण्यात आली होती.

logo
marathi.freepressjournal.in