तांबड्या समुद्रात जहाजाचे अपहरण

काही दिवसांपूर्वी हुती बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या जेद्दा येथील तेल साठ्यांवर हल्ला केला होता.
तांबड्या समुद्रात जहाजाचे अपहरण

येमेन : येमेनच्या हुती बंडखोरांनी तुर्कीयेवरून भारतात जाणाऱ्या मालवाहू जहाजाचे रविवारी अपहरण केले आहे, अशी माहिती इस्त्रायलच्या डिफेन्स फोर्सने दिली आहे.

तांबड्या समुद्रात येमेनजवळ एक मालवाहू जहाज अपह्रत केले आहे. जागतिक स्तरावर ही गंभीर घटना आहे. या जहाजात अनेक देशांचे नागरिक होते.

येमेनच्या हुती बंडखोरांनी इस्त्रायली जहाजाला धमकी दिली. इस्त्रायली कंपन्यांच्या जहाजांना लक्ष्य केले जाईल, असा इशारा हुती बंडखोरांनी दिला होता. तसेच ज्या जहाजावर इस्त्रायलचा झेंडा दिसेल त्याला आग लावली जाईल.

हुती बंडखोरांच्या प्रवक्त्याने सांगितले की, इस्त्रायलच्या जहाजावर काम करणाऱ्या नागरिकांना आपापल्या देशांच्या नागरिकांना परत बोलवावे.काही दिवसांपूर्वी हुती बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या जेद्दा येथील तेल साठ्यांवर हल्ला केला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in