विष बांगलादेशात विष पाजून हिंदूची हत्या

बांगलादेशात हिंदूंचे राहणे अधिकाधिक धोकादायक बनत चालले आहे. बांगलादेशातील सुनामगंज जिल्ह्यात जॉय महापात्रो याला खूप मारहाण करून विष पाजून त्याची हत्या करण्यात आली, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.
विष बांगलादेशात विष पाजून हिंदूची हत्या
विष बांगलादेशात विष पाजून हिंदूची हत्याफोटो : एक्स
Published on

ढाका : बांगलादेशात हिंदूंचे राहणे अधिकाधिक धोकादायक बनत चालले आहे. बांगलादेशातील सुनामगंज जिल्ह्यात जॉय महापात्रो याला खूप मारहाण करून विष पाजून त्याची हत्या करण्यात आली, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.

जॉयला विष दिल्यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला. विविध प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्या व मानवाधिकार संघटनांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हिंदूंच्या हत्या होत आहेत. गेल्या १८ ते २० दिवसांत ६ ते ७ हिंदूंच्या हत्या झाल्या आहेत. दीपू चंद्र दास, राणा प्रताप बैरागी, मोनी चक्रवर्ती आणि मिथुन सरकार अशी मृतांची नावे आहेत.

भारत सरकारच्या अधिकृत निवेदनानुसार, शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर आतापर्यंत २३ हिंदूंच्या हत्या झाल्या आहेत, तर हिंदू एकता परिषद संघटनेच्या दाव्यानुसार, ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२४ दरम्यान हिंदूंच्या मृतांचा आकडा ८२ झाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in