अमेरिकेत हिंदू मंदिराची तोडफोड

अमेरिकेत कॅलिफोर्निया येथील चिनो हिल्स परिसरातील एका हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली.
अमेरिकेत हिंदू मंदिराची तोडफोड
एक्स @gauagg
Published on

कॅलिफोर्निया : अमेरिकेत कॅलिफोर्निया येथील चिनो हिल्स परिसरातील एका हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली. तसेच या ठिकाणी अपशब्दही लिहिण्यात आले आहेत. या घटनेनंतर अमेरिकेतील हिंदू समुदायामध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शनिवारी ‘बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थे’ने (बीएपीएस) याबाबत सोशल मीडियावर एक निवेदन जारी केले होते. त्यात त्यांनी म्हटलेय की, चिनो हिल्समध्ये असलेल्या श्री स्वामीनारायण मंदिराची विटंबना झाली आहे. ‘मोदी-हिंदुस्थान मुर्दाबाद’ यासह पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली आहे. सात महिन्यांपूर्वीही अमेरिकेत अशीच घटना घडली होती. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो येथील श्री स्वामीनारायण मंदिरात तोडफोड करण्यात आली होती.

दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेचा निषेध केला आहे. एक निवेदन जारी करून परराष्ट्र मंत्रालयाने आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अमेरिकतील हिंदू समुदायानेही या घटनेचा निषेध केला आहे. २०२२ पासून आतापर्यंत अमेरिकेत किमान ६ मंदिरांमध्ये नासधुस करून हिंदूंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये लिहिली असल्याचे हिंदू संघटनांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in