पाकच्या निवडणुकीत पहिल्यांदाच हिंदू महिला; डॉ. सविरा प्रकाश खैबर पख्तुनख्वा प्रांतातून रिंगणात

बिलावल भुट्टो झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या तिकिटावर खैबर पख्तुनख्वा प्रांतातून अर्ज भरला आहे.
पाकच्या निवडणुकीत पहिल्यांदाच हिंदू महिला;
डॉ. सविरा प्रकाश खैबर पख्तुनख्वा प्रांतातून रिंगणात
PM

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीबाबत एकामागून एक धक्कादायक बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. इम्रान खान यांच्याविरोधात मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफीज सईद याचा मुलगा निवडणूक लढणार असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर आता खैबर पख्तुनख्वा प्रांतातून पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच सविरा प्रकार या हिंदू महिला डॉक्टर निवडणूक लढवणार असल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. डॉ.सविरा प्रकाश यांनी बिलावल भुट्टो झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या तिकिटावर खैबर पख्तुनख्वा प्रांतातून अर्ज भरला आहे.

डॉ. सविरा प्रकाश बिलावल या खैबर पख्तुनख्वामधील बुनेर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्या वैद्यकीय पदवीधर आहेत आणि बिलावल भुट्टो झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी)च्या तिकिटावर सर्वसाधारण जागेवरून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, सविरा प्रकाश पीपीपीच्या महिला विंगच्या सरचिटणीस आहेत. त्यांचे वडील डॉ. ओम प्रकाश हे तीन दशकांहून अधिक काळ पीपीपीचे सदस्य आहेत.

साविरा यांनी २०२२ मध्ये खैबर पख्तुनख्वामधील अबोटाबाद जिल्ह्यातील खासगी महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी घेतली आहे. वैद्यकीय सेवा करणे त्यांच्या रक्तात आहे. त्यांनी पाकिस्तानमध्ये महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

पाकमध्ये मुस्लिमेतरांसाठी १० जागा

डॉ. सविरा म्हणाल्या की, पाकिस्तानातील सरकारी रुग्णालयांमधील दुरवस्था मी स्वत: अनुभवली आहे. यातूनच निवडणूक लढवण्याची प्रेरणा मिळाली.’’ पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी २०२४ रोजी निवडणुका होणार आहेत. सोमवारपर्यंत या निवडणुकीसाठी किमान २८,६२६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. पाकिस्तानमध्ये महिलांसाठी ६० जागा राखीव आहेत, तर मुस्लिमेतरांसाठी १० जागा आहेत. याशिवाय ते सर्व २६६ जागांवर निवडणूक लढवू शकतात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in