मी अल्लाहचा गुलाम, विमान उडवून देणार!

प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता विमान पुन्हा सिडनीला नेण्यात आलं
मी अल्लाहचा गुलाम, विमान उडवून देणार!

सिडनी : सिडनीहून क्वॉलालम्पूरला १९४ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या मलेशिया एअरलाईन्सच्या विमानात एका प्रवाशाने आपण अल्लाहचे गुलाम आहोत. असे म्हणत विमान उडवून देण्याची धमकी दिली. विमान हवेत उडत असताना हा प्रकार घडल्यामुळे विमानात एकच हल्लकल्लोळ माजला. या घटनेचा हादरवून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव मोहम्मद असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

मलेशिया एअरलाईन्सचे विमान सिडनीहून क्वॉलालम्पूरला जात असताना विमानातील एक प्रवासी मोहम्मद याने सर्व प्रवाशांच्या काळजाचा थरकाप उडवणारे कृत्य केले. मी अल्लाहचा गुलाम आहे, तुम्ही अल्लाहचे गुलाम आहात का? असा प्रत्येक प्रवाशाला प्रश्न विचारू लागला. यावेळी त्याने विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. व्यक्तीने बॅगेत हातही टाकला, त्यामुळे लोक आणखी घाबरले. त्याने विमानात नमाजही अदा केली. धमकीनंतर त्याच्या बॅगची तपासणी करण्यात आली. मात्र त्यात कोणत्याही नुकसान करणाऱ्या वस्तू आढळल्या नाहीत. या विमानात एकूण १९४ प्रवासी होते. सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मलेशिया एअरलाईन्सने दिली. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता विमान पुन्हा सिडनीला नेण्यात आलं आणि इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in