आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांना अटक व पती अभिषेक झावरही ईडीची कारवाई

आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांना अटक व पती अभिषेक झावरही ईडीची कारवाई

ईडीच्या विविध पथकांकडून अवैध खाणकाम आणि बेनामी कंपन्यांप्रकरणी विविध ठिकाणी ६ मे रोजी छापे टाकण्यात आले होते. आयएएस अधिकारी आणि झारखंडच्या खाणकाम व उद्योग विभागाच्या सचिव पूजा सिंघल यांच्या सरकारी निवासस्थानासह, पतीच्या घरी आणि त्यांच्याशी संबंधित ठिकाणीही ईडीने छापे टाकले होते. या छाप्यानंतर बुधवारी ईडीने पूजा सिंघल आणि त्यांचे पती अभिषेक झा यांना अटक केली आहे. पूजा सिंघल यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. पूजा सिंघल या २००० च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत.

अभिषेक यांची बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली. पूजा सिंघल आणि अभिषेक झा यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. ईडीने अभिषेक झा यांच्या पल्स हॉस्पिटलवर देखील छापे टाकले होते. पल्स हॉस्पिटलमध्ये आलेली गुंतवणूक कुठून आली, असा प्रश्न ईडीने विचारला होता. हॉस्पिटलमध्ये १२३ कोटींची गुंतवणूक झाल्याचे दिसत असून तुम्ही २३ कोटीचा उल्लेख कसा करता, असा सवाल अभिषेक झा यांना केला आहे.

ईडीने पूजा सिंघल यांच्याशी संबंधित सीएच्या घरातून १९.३१ कोटी रुपये जप्त केले होते. ईडीने मुंबई, दिल्ली, जयपूर आणि रांचीमध्ये छापे टाकले. ईडीला जप्त केलेली रोख रक्कम ताब्यात घेण्यासाठी बस बोलवावी लागली होती.

ईडीने पूजा सिंघल यांचे सासरे कामेश्वर झा यांना याआधी अटक केली होती. मधुबनी येथील निवासस्थानातून त्यांना अटक करण्यात आली. पूजा सिंघल या झारखंडमधील वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत. सध्या त्या खनिकर्म आणि उद्योग मंत्रालयाच्या सचिव म्हणून काम करत आहेत. पूजा सिंघल झारखंड राज्य खाण विकास महामंडळाच्या अध्यक्षा आहेत. भाजप सरकारच्या काळात त्या कृषी सचिव म्हणून काम करत होत्या. पूजा सिंघल यांच्यावर चतरा, खुंटी आणि पलामू जिल्ह्यात उपायुक्त असताना आर्थिक अनियमिततेचे आरोप लावण्यात आले होते. ईडीने पूजा सिंघल यांच्या विरोधात न्यायालयात मनरेगा घोटाळा प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in