अमेरिकी निवडणुकीत भारतीयांना महत्त्व; बायडेन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाचा हिंदू मतांवर भर

डेमोक्रॅटिक पक्षाने हिंदू-अमेरिकनांना एकत्र करणे आवश्यक आहे, कारण ते पुढील वर्षी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या फेरनिवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात
अमेरिकी निवडणुकीत भारतीयांना महत्त्व;
बायडेन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाचा हिंदू मतांवर भर
PM

वॉशिंग्टन : पुढील वर्षी अमेरिकेत होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत तेथील भारतीयांच्या मतांना महत्त्व प्राप्त झाले आहे. अध्यक्ष जोसेफ बायडेन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाने अमेरिकी हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न चालवले आहेत.

डेमोक्रॅटिक पक्षाने हिंदू-अमेरिकनांना एकत्र करणे आवश्यक आहे, कारण ते पुढील वर्षी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या फेरनिवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. बायडेन यांच्या प्रशासनाला इस्रायल-हमास युद्धादरम्यान मुस्लीम-अमेरिकनांकडून फारसा पाठिंबा मिळत नाही. त्यामुळे हिंदू-अमेरिकन मतांवर विशेष भर देणे गरेजेचे आहे, असे मत मॅसॅच्युसेट्स येथील डेमोक्रॅटिक पक्षासाठी निधी उभारणी करणारे प्रतिनिधी रमेश कपूर यांनी व्यक्त केले आहे.

डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीच्या हिवाळी बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी वॉशिंग्टन येथे आलेले रमेश कपूर म्हणाले की, हिंदू-अमेरिकन आणि भारतीय-अमेरिकन हे पारंपरिकपणे लोकशाही समर्थक आहेत. परंतु गेल्या काही निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या मतपेढीत वाढ झाली आहे. बायडेन यांच्या पुनर्निवडणुकीच्या मोहिमेसाठी हिंदू मते अत्यंत महत्त्वाची का बनली आहेत, याचा तपशीलवार अहवाल डीएनसी आणि पक्षाच्या नेत्यांना सादर केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in