पक्षाघातातून मेंदू सावरण्यासाठी झोप सुधारा! युनिव्हर्सिटी ऑफ रोचेस्टर मेडिकल सेंटरच्या नवीन संशोधनातून उघड

शरीराची नैसर्गिक दैनंदिन लय सुधारून झोपेत सुधारणा केल्यास, पक्षाघातानंतर मेंदूला पूर्वस्थितीत येण्यास मदत होऊ शकते. यामुळे मेंदूतील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याची प्रक्रिया वेगवान होण्यास आणि रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होण्यास एक नवीन धोरण मिळू शकते, असे एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे.
पक्षाघातातून मेंदू सावरण्यासाठी झोप सुधारा! युनिव्हर्सिटी ऑफ रोचेस्टर मेडिकल सेंटरच्या नवीन संशोधनातून उघड
पक्षाघातातून मेंदू सावरण्यासाठी झोप सुधारा! युनिव्हर्सिटी ऑफ रोचेस्टर मेडिकल सेंटरच्या नवीन संशोधनातून उघड
Published on

नवी दिल्ली : शरीराची नैसर्गिक दैनंदिन लय सुधारून झोपेत सुधारणा केल्यास, पक्षाघातानंतर मेंदूला पूर्वस्थितीत येण्यास मदत होऊ शकते. यामुळे मेंदूतील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याची प्रक्रिया वेगवान होण्यास आणि रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होण्यास एक नवीन धोरण मिळू शकते, असे एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे.

‘जर्नल ऑफ क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या या निष्कर्षांनुसार, शरीराची नैसर्गिक ‘सर्केडियन रिदम’ (जैविक घड्याळाची लय) मजबूत करण्यासाठी तयार करण्यात आलेले उपाय- जसे की ठरावीक वेळी प्रकाशाचा मारा करणे, मेलाटोनिन किंवा जैविक घड्याळाला लक्ष्य करणारे औषधामुळे पक्षाघात आलेल्या उंदरांमध्ये सुधारणा झाल्या.

युनिव्हर्सिटी ऑफ रोचेस्टर मेडिकल सेंटरच्या संशोधकांना आढळले की, यामुळे मेंदूतील टाकाऊ पदार्थ साफ करणारी प्रणाली म्हणजेच ‘ग्लिम्फॅटिक सिस्टीम’ सुधारली आणि स्ट्रोकनंतर मेंदूमध्ये जमा होणाऱ्या दाहक रेणूंचे प्रमाणही कमी झाले.

ही प्रणाली रक्तवाहिन्यांद्वारे आणि मेंदूच्या ऊतींमधून सेरेब्रोस्पाइनल द्रव वाहून नेते, ज्यामुळे मेंदूला पोषक तत्त्वे मिळतात आणि टाकाऊ पदार्थ व दाहक संकेत बाहेर टाकण्यास मदत होते.

पक्षाघाताच्या सुधारणेची चर्चा खऱ्या अर्थाने या विचाराने सुरू होते की, पक्षाघात ही केवळ रक्तवाहिन्यांशी संबंधित घटना नाही, तर तो वेळेच्या नियोजनाचा बिघाड देखील आहे, असे मुख्य लेखिका आणि युनिव्हर्सिटी ऑफ रोचेस्टर मेडिकल सेंटरमधील न्यूरोसायंटिस्ट लॉरेन हॅब्लिट्झ यांनी सांगितले.

स्ट्रोक आणि वेळेचा संबंध

पक्षाघात हे दिवसाच्या एका विशिष्ट आणि अंदाज लावता येण्याजोग्या पॅटर्नचे पालन करतात असे मानले जाते; सकाळी पक्षाघात येण्याची शक्यता जास्त असते.

तसेच, झोपेची वेळ संपत आलेली असताना पक्षाघात येणे अधिक गंभीर असू शकते. अनेक पक्षाघाताच्या रुग्णांना त्यांच्या दुखापतीनंतर झोप आणि जागे होण्याच्या चक्रात अडथळा जाणवतो. हा अडथळा मंद रिकव्हरी, नैराश्य आणि खालावलेल्या जीवनमानाशी संबंधित असतो, असे संशोधकांनी सांगितले.

संशोधनातील निष्कर्ष व उपाय

संशोधकांच्या पथकाने शरीराच्या अंतर्गत घड्याळावर प्रभाव टाकणाऱ्या उपायांचे मूल्यमापन केले. यामध्ये ठरावीक वेळचा प्रकाश, मेलाटोनिन, ‘केएल००१’ नावाचे घड्याळाला लक्ष्य करणारे औषध आणि ठराविक वेळेत अन्न घेणे यांचा समावेश होता. निरोगी प्राण्यांमध्ये हे सर्व उपाय ग्लिम्फॅटिक कार्यक्षमता वाढवू शकतात असे दिसले.

logo
marathi.freepressjournal.in