इम्रान खान युतीस तयार

पीटीआय पक्ष युती करून देखील पंजाब प्रांतात सरकार स्थापन करु शकणार नाही असा अंदाज येथे वर्तवण्यात येत आहे.
इम्रान खान युतीस तयार
Published on

स्लामाबाद : पाकिस्तानात ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत २६६ जागांपैकी १०१ जागा जिंकून सर्वात मोठा विजयी पक्ष ठरलेला इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्ष सरकार स्थापनेसाठी युती करण्यास राजी झाला असून दोन धार्मिक गटांशी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. पाकिस्तानात सरकार स्थापनेसाठी बहुमताचा आकडा १६६ आहे.

पाकिस्ताने तेहरिक-ए-इन्साफ पक्षाने आता केंद्र व पंजाब येथे सरकार स्थापन करण्यासाठी मज्लीस वाहदते-मुस्लमीन एमडब्ल्यूएम पक्षाशी तर प युतीची बोलणी सुरू केली आहेत. तसेच आणि खैबर पख्तुनवा येथे सरकार स्थापन करण्यासाठी जमाती-ए-इस्लामी (जेआय) या पक्षासोबत चर्चा सुरू केली आहे, अशी माहिती पीटीआयचे माहिती सचिव रौफ हसन यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

पीटीआय पक्ष युती करून देखील पंजाब प्रांतात सरकार स्थापन करु शकणार नाही असा अंदाज येथे वर्तवण्यात येत आहे. याउलट खैबर पख्तुनवा येथे युतीशिवायच पीटीआय सरकार स्थापन करु शकेल असे बोलले जात आहे. पीटीआयचा पाठिंबा असलेले १०१ उमेदवार या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झाले आहेत. तर नवाज शरीफ यांच्या पीएमएल-एन अर्थात पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ पक्षाने ७५ जागांवर तर माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो यांच्या पीपीपी पक्षाने ५४ जागांवर विजय मिळवला आहे. मात्र नवाझ शरीफ यांनी सरकार स्थापनेसाठी अपक्षांसोबत चर्चा सुरु केली आहे. दरम्यान पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रपती डॉ. अरिफ अल्वी यांची भेट घेतली असून निवडणुकीत अफरातफर झाल्याची माहिती दिली आहे. पीटीआय पक्षाचे नेते रौफ हसन आणि उमेर नियाझी यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन निवडणुकीतील गैरप्रकारांची माहिती दिली. तसेच पक्षाला दाबून टाकण्याचे प्रयत्न, निवडणूक निशाणी रद्द करण्याची कृती, कित्येक कार्यकर्त्यांना झालेली अटक अशा अनंत अडचणी आल्या असतांनाही पीटीआय पक्षाने घवघवीत यश मिळवले आहे असे विधान पीटीआयच्या या नेत्यांनी केले आहे. दरम्यान इम्रान खान यांच्या पक्षाने केंद्र, पंजाब व खैबर पख्तूनख्वा येथे सरकार स्थापन करण्यासाठी विशेष समित्यांची स्थापना केली आहे. पक्षाचा कोअर कमिटी बैठकीत महत्त्वाच्या सरकारी पदांसाठी लवकरच अर्ज करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती डॉन वर्तमान पत्राने दिली आहे.

जनमताचा कौल आम्हालाच

पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाने वटवाघूळ ही निवडणूक निशाणी गमावल्यामुळे या पक्षाच्या समर्थकांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. अशा १०१ उमेदवारांना निवडणुकीत विजय मिळाला आहे. तर पाकिस्तानच्या संसदेत एकूण २६६ खासदार असून सरकार स्थापनेसाठी १३३ खासदारांची गरज असते. या निवडणुकीत इम्रान खान यांचाच पक्ष निवडून आलेला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यामुळे जनकौल आम्हालाच मिळाला आहे, असा पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचा दावा आहे. इम्रान खान हेच पाकिस्तानचे खरे देशभक्त असून त्यांना तोड नाही, असे या पक्षाचे मत आहे.

logo
marathi.freepressjournal.in