तोशाखाना प्रकरणात इम्रान आणि बुशरा दोषी

इस्लामाबादमधील विशेष न्यायालयाने गुरुवारी माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना नवीन तोशाखाना प्रकरणात दोषी ठरवले.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

इस्लामाबाद : इस्लामाबादमधील विशेष न्यायालयाने गुरुवारी माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना नवीन तोशाखाना प्रकरणात दोषी ठरवले. नॅशनल अकाऊंटेबिलिटी ब्युरोने (एनएबी) इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रावळपिंडी येथील अदियाला जेलच्या विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर इम्रान खान आणि बुशरा बीबी यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले. इम्रान खान याआधीच आणखी एका प्रकरणात तुरुंगात आहेत. याआधी तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांना तोशाखान्याशी संबंधित आणखी एका प्रकरणात जामीन मिळाला होता. मात्र, त्यांची तुरुंगातून सुटका झाली नाही.

logo
marathi.freepressjournal.in