इम्रान खान आणि पत्नीला १४ वर्षांची कैद

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना तोशखाना प्रकरणात तेथील न्यायालयाने १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
इम्रान खान आणि पत्नीला १४ वर्षांची कैद

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना तोशखाना प्रकरणात तेथील न्यायालयाने १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. बुधवारी न्यायालयाने इम्रान खान आणि बुशरा बीबी यांना प्रत्येकी ७८७ दशलक्ष पाकिस्तानी रुपयांचा दंडही ठोठावला. खान पंतप्रधान असताना विविध देशांच्या दौऱ्यांमध्ये त्यांना अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या. त्या त्यांनी सरकारी कोषागारात (तोशखान्यात) जमा न करता घरी नेल्या आणि नंतर बाजारात चढ्या भावाने विकल्या. या प्रकरणी त्यांना यापूर्वीच तीन वर्षांची शिक्षा झाली होती. ते सध्या रावळपिंडीतील अदियाला तुरुंगात आहेत. तसेच सरकारी गुपिते फोडल्याप्रकरणी (सायफर केस) नुकतीच त्यांनी १० वर्षींची शिक्षा झाली होती.

logo
marathi.freepressjournal.in