माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह पत्नीला १७ वर्षांची शिक्षा; पाकिस्तानी न्यायालयाचा निर्णय

भ्रष्टाचाराच्या तोशाखाना प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना 'फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी'च्या विशेष न्यायालयाने प्रत्येकी १७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच दोघांनाही १६.४ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह पत्नीला १७ वर्षांची शिक्षा
माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह पत्नीला १७ वर्षांची शिक्षाPhoto : X
Published on

इस्लामाबाद : भ्रष्टाचाराच्या तोशाखाना प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना 'फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी'च्या विशेष न्यायालयाने प्रत्येकी १७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच दोघांनाही १६.४ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हे प्रकरण एका महागड्या बुल्गारी घड्याळाचा सेट खूप कमी पाकिस्तानी न्यायालयाचा निर्णय किमतीत खरेदी करण्याशी संबंधित आहे.

तोशाखाना प्रकरणात भ्रष्टाचाराच्या इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी या दोघांचीही भूमिका गंभीर होती, असे न्यायालयाने म्हटले आहे. डॉन वृत्तपत्रानुसार, न्यायालयाने शिक्षा सुनावताना इम्रानचे जास्त वय (७३ वर्षे) आणि बुशरा महिला असल्याचा विचार केला व शिक्षा देताना नरमाई दाखवण्यात आल्याचे म्हटले आहे.

इम्रान खान २०२३ पासून रावळपिंडीच्या आदियाला तुरूंगात बंदिवासात आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मृत्यूच्या अफवेमुळे पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, त्यानंतर तुरुंग प्रशासनाने इम्रान खान यांच्या प्रकृतीबद्दलच्या अफवा निराधार आहेत आणि त्यांना सर्व प्रकारची वैद्यकीय मदत देण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण दिले होते.

तोशाखाना प्रकरण

तोशाखाना हे पाकिस्तानधील एका शासकीय विभागाचे नाव आहे. लोकप्रतिनिधींना ठिकठिकाणी दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू तोशाखाना विभागात जमा कराव्या लागतात. इम्रान खान यांनी त्यांना मिळाळेल्या मौल्यवान भेटवस्तू विकल्या आणि त्यातून पैसे मिळवले. तसेच त्यांनी मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती तोशाखाना विभागाकडे उघड न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

इम्रान खान २०१८ मध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. तेव्हापासून त्यांना वेगवेगळ्या देशांकडून मौल्यवान वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. मात्र, या भेटवस्तूंची माहिती त्यांनी तोशाखाना विभागाला दिलेली नाही. तसे केले तर पाकिस्तानचे इतर देशांशी असलेले संबंध बिघडतील, असा दावा इम्रान खान यांच्याकडून केला जातो. हाच मुद्दा घेऊन विरोधकांनी त्यांच्यावर आरोप केले होते.

उच्च न्यायालयात आव्हान

तोशाखाना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना विशेष न्यायालयाने प्रत्येकी १७ वर्षांची शिक्षा सुनावली. या निर्णयाच्या विरोधात आता इम्रान खान उच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे. त्यांच्या वकिलांनी हा निर्णय कायद्याच्या आणि तथ्यांच्या विरुद्ध असल्याचा युक्तिवाद केला असल्याचे वृत्तात म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in