... त्यामुळे देशाची प्रतिमा मलीन झाली - पाकिस्तान राष्ट्रपती आरिफ अल्वी

सुटकेनंतर इम्रान म्हणाले की, ‘‘मला रिमांडच्या काळात मारहाण करण्यात आली. हायकोर्टातून माझे अपहरण
... त्यामुळे देशाची प्रतिमा मलीन झाली - पाकिस्तान राष्ट्रपती आरिफ अल्वी

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर ठरवत त्यांच्या सुटकेचे आदेश पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने गुरुवारी दिले. त्यानंतर इम्रान खान यांची तत्काळ सुटका करण्यात आली आहे.

अल-कादिर ट्रस्टमध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप करत इम्रान खान यांना मंगळवारी अटक झाली होती. त्या विरोधात इम्रान यांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले. कोर्टाने सांगितले की, न्यायालयाच्या आवारात इम्रान यांची अटक ही अपमान करणारी आहे. त्यांची अटक ही बेकायदेशीर असून राष्ट्रीय उत्तरदायित्व विभागाने तत्काळ त्यांची सुटका करावी. त्यानंतर इम्रान खान यांची सुटका करण्यात आली.

सुप्रीम कोर्टाने इम्रान खान यांना इस्लामाबाद हायकोर्टात हजर राहण्यास सांगितले होते. पाकच्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या खंडपीठाने सांगितले की, हायकोर्टाचा निर्णय इम्रान यांना मानावा लागेल. सुटकेनंतर इम्रान म्हणाले की, ‘‘मला रिमांडच्या काळात मारहाण करण्यात आली. हायकोर्टातून माझे अपहरण करण्यात आले.’’

दरम्यान, पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना पत्र लिहून इम्रान यांच्या अटकेवर शंका व्यक्त केली होती. इम्रान यांना न्यायालयाच्या परिसरात अटक करण्यात आली. त्यामुळे देशाची प्रतिमा मलीन झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची टर उडवली जात आहे, असे राष्ट्रपतींनी म्हटले होते.

logo
marathi.freepressjournal.in