श्रीलंकेत यूएनपीचे नेते रानिल विक्रमसिंघे यांनी घेतली पंतप्रधान पदाची शपथ

श्रीलंकेत यूएनपीचे नेते रानिल विक्रमसिंघे यांनी घेतली पंतप्रधान पदाची शपथ
Published on

श्रीलंकेत यूएनपीचे नेते रानिल विक्रमसिंघे यांनी गुरुवारी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मुख्य विरोधी पक्षाने सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिल्याने राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांच्यासमोर दुसरा कोणताच पर्याय नव्हता. त्यामुळे यूएनपीचे एकमेव सदस्य असलेले रानिल विक्रमसिंघे यांची त्यांनी पंतप्रधानपदासाठी निवड केली व गुरुवारी सायंकाळी विक्रमसिंघे यांचा पंतप्रधानपदाचा शपथविधी पार पडला.

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे आणि विक्रमसिंघे यांच्यात झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. सोमवारी महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. रानिल विक्रमसिंघे यांनी यापूर्वी चार वेळा श्रीलंकेचे पंतप्रधान भूषवले आहे.

विक्रमसिंघे यांची भारत

समर्थक म्हणून ओळख

श्रीलंकेचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणाऱ्या रानिल विक्रमसिंघे यांना भारत समर्थक म्हणून ओळखले जाते. रानिल विक्रमसिंघे हे पंतप्रधान झाल्याने भारत आणि श्रीलंका यांच्यातील संबंध सुधारण्याची शक्यता आहे. महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर श्रीलंकेत हिंसक घटना घडल्या होत्या. आंदोलकांनी महिंदा राजपक्षे यांचे खासगी निवासस्थान पेटवले होते. महिंदा राजपक्षे यांचे शासकीय निवासस्थान देखील पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. श्रीलंकेत उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये आतापर्यंत एका खासदारासह ८ लोकांचा मृत्यू झाला असून २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. परकीय चलनाच्या तुटवड्यामुळे श्रीलंका आर्थिक संकटात सापडली असून तेथे अराजक निर्माण झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in