नवी दिल्ली येथे ‘डीसीपीसी’अंतर्गत उद्योगाला उत्कृष्टता केंद्राबरोबर जोडा संमेलनाचे उद्‌घाटन

नवी दिल्ली येथे ‘डीसीपीसी’अंतर्गत उद्योगाला उत्कृष्टता केंद्राबरोबर जोडा संमेलनाचे उद्‌घाटन

भागीदारांमधील सहकार्याचे महत्त्व सांगताना केंद्रीय रसायने आणि खते राज्य मंत्री आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री भगवंत खुबा म्हणाले, “उद्योग आणि संस्थांनी केवळ एकत्र काम करू नये, तर एकत्र विकसित व्हावे.” संशोधन आणि नवोन्मेशाच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी सरकारने सीआयपीईटी आणि देशभरातल्या अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये उत्कृष्टता केंद्रांची निर्मिती केल्याचे त्यांनी सांगितले.

रसायने आणि खते राज्य मंत्री आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री भगवंत खुबा यांनी हॅबिटॅट वर्ल्ड, इंडिया हॅबिटॅट सेंटर, नवी दिल्ली येथे ‘डीसीपीसी’अंतर्गत उद्योगाला ‘उत्कृष्टता केंद्राबरोबर जोडा” संमेलनाचे उद्‌घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम खते आणि पेट्रोकेमिकल्स विभागा (डीसीपीसी) अंतर्गत पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान मध्यवर्ती संस्था (सीआयपीईटी) यांनी आयोजित केला होता. यावेळी भगवंत खुबा यांनी आज उत्कृष्टता केंद्र आणि इंडस्ट्री कनेक्ट पोर्टल यासह सीआयपीईटीच्या न्यूज लेटरचे प्रकाशन केले.

उत्कृष्टता केंद्र (CoEs) पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत अभियानाची पूर्तता करण्यासाठी घेत असलेल्या प्रयत्नांचे केंद्रीय राज्य मंत्र्यांनी कौतुक केले. निष्कर्ष प्रदर्शित करण्यासाठी, संभाव्य औद्योगिक भागीदार ओळखण्यासाठी आणि उद्योगाच्या भविष्यातल्या गरजा समजून घेण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी डीसीपीसी आणि सीआयपीईटी यांनी केलेल्या प्रयत्नांची नोंद घेऊन ते म्हणाले की उत्कृष्टता केंद्र (CoEs) ऊर्जा कार्यक्षम उपकरणे, पर्यावरण पूरक पाॅलिमेरिक उत्पादने, कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापर, स्मार्ट पाॅलिमर, आरोग्य सेवेमधील पाॅलिमर या क्षेत्रात काम करत आहेत. त्याचा फायदा देशांतर्गत तंत्रज्ञानाचा विकास आणि स्टार्टअप उद्योगाला होत असल्याचे ते म्हणाले. या प्रकल्पांचे संशोधन परिणाम भविष्यात भारताला स्वदेशी तंत्रज्ञानाचे केंद्र बनवतील असे ते म्हणाले. जैव वैद्यकीय उपकरणे आणि खेळण्यांच्या प्रकल्पांमुळे भारत आयातीवर कमी अवलंबून राहील आणि त्यामुळे आपले परदेशी चलन वाचेल असे ते म्हणाले.

प्रधानमंत्र्यांच्या आत्मनिर्भर भारताच्या आवाहनाचा पुनरुच्चार करत राज्यमंत्री म्हणाले की, “भारतामध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता नाही आणि आपल्या उत्पादनांना जगभरात बाजारपेठ मिळावी यासाठी उद्योगांना आकर्षित करण्यासाठी सरकार अनेक पावलं उचलत आहे.”

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in