भारत-चीन तणाव निवळणार! पूर्व लडाखमधील ‘एलएसी’ गस्तीबाबत झाला करार

प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर गस्त घालण्याबाबत भारत आणि चीन यांच्यात एक नवीन करार झाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत एक निवदेन जारी केले आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर (एलएसी) गस्त घालण्याबाबत भारत आणि चीनच्या अधिकाऱ्यांमधील चर्चा फलदायी ठरली असून त्याबाबत करार करण्यात आला आहे, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सोमवारी येथे सांगितले.

भारत आणि चीनमधील अन्य वादांच्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांचे अधिकारी गेल्या काही आठवड्यांपासून चर्चा करीत आहेत. डेपसांग आणि डेमचोक परिसरातील गस्तीबाबतचा करार करण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियातील कझान येथे ब्रिक्स शिखर परिषदेला हजर राहण्यासाठी रवाना होण्यापूर्वीच एक दिवस अगोदर या कराराबाबतची घोषणा करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची ब्रिक्स शिखर परिषदेच्या वेळी चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र तशी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर गस्त घालण्याबाबत भारत आणि चीन यांच्यात एक नवीन करार झाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत एक निवदेन जारी केले आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री म्हणाले की, गेल्या अनेक आठवड्यांपासून भारत आणि चीनमध्ये राजनैतिक आणि लष्करी स्तरावर चर्चा सुरू आहे. सैन्य मागे घेण्यासाठी आणि परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी गस्तीची व्यवस्था करण्यात आली आहे.

गलवानची पुनरावृत्ती टळणार

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री म्हणाले, आम्ही अजूनही काम करत आहोत. गेल्या अनेक आठवड्यांपासून चर्चा सुरू आहे. त्यानुसार, भारत - चीन सीमा भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याच्या व्यवस्थेवर एकमत झाले आहे. २०२० मध्ये या गलवान खोऱ्यात उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण केले जात आहे. भारत आणि चीन गेल्या काही आठवड्यांपासून सीमा समस्या सोडवण्यासाठी संपर्कात आहेत. हा करार डेपसांग आणि डेमचोक भागातील गस्त व्यवस्थेशी संबंधित आहेत.

logo
marathi.freepressjournal.in