भारताचा रशियालाही पाठिंबा नाही, UNSC मध्ये रशियाच्या युक्रेनवरील प्रस्तावावर मतदानापासून राखले अंतर


भारताचा रशियालाही पाठिंबा नाही, UNSC मध्ये रशियाच्या युक्रेनवरील प्रस्तावावर मतदानापासून राखले अंतर

रशिया-युक्रेन युद्धाचा आज 29वा दिवस आहे. रशियाने आज युक्रेनमधील मानवतावादी परिस्थितीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला (UNSC) मसुदा सादर केला. तटस्थतेचे धोरण कायम ठेवत भारताने पुन्हा एकदा मतदान टाळले. भारतासह 13 देशांनी या मसुद्यावर मतदानात भाग घेतला नाही. तर चीन आणि रशियाने याला पाठिंबा दिला.

दुसरीकडे, इस्रायलने रशियाच्या नाराजीची भीती दाखवून गुप्तचर सॉफ्टवेअर पेगासस स्पायवेअर युक्रेनला देण्यास नकार दिला आहे. त्याच वेळी, नाटोने युक्रेनला आण्विक, रासायनिक, जैविक आणि रेडिओलॉजिकल हल्ले टाळण्यासाठी आवश्यक उपकरणे पाठवण्यास सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in