‘टॅरिफ’च्या घोषणेनंतर भारताची अमेरिकेकडून दुप्पट तेल खरेदी

यंदाच्या एप्रिलमध्ये ट्रम्प यांनी टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर भारताने अमेरिकेकडून तेल खरेदी दुप्पट केली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत वर्षाच्या सरासरी ११४ टक्के तेल खरेदी केली आहे.
‘टॅरिफ’च्या घोषणेनंतर भारताची अमेरिकेकडून दुप्पट तेल खरेदी
Published on

नवी दिल्ली : यंदाच्या एप्रिलमध्ये ट्रम्प यांनी टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर भारताने अमेरिकेकडून तेल खरेदी दुप्पट केली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत वर्षाच्या सरासरी ११४ टक्के तेल खरेदी केली आहे.

२०२४ मध्ये एप्रिल ते जूनदरम्यान भारताने अमेरिकेकडून १५ हजार कोटींचे तेल खरेदी केले होते. २०२५ च्या एप्रिल ते जूनदरम्यान हाच आकडा ३२ हजार कोटी झाला.

भारताने यंदा जानेवारी ते जूनदरम्यान २.७१ लाख पिंप कच्चे तेल खरेदी केले. २०२४ मध्ये जानेवारी ते जूनदरम्यान भारताने १.८ लाख पिंप तेल खरेदी केले. जुलै २०२५ मध्ये जूनच्या तुलनेत २३ टक्के अधिक तेल अमेरिकेतून आयात करण्यात आले. भारताच्या तेल आयातीत अमेरिकेची हिस्सेदारी ३ वरून ८ टक्के झाली आहे.

रशियाकडून ४० टक्के तेल खरेदी

भारत सध्या रशियाकडून आपल्या गरजेच्या ४० टक्के तेल खरेदी करतो. दर दिवशी १.१५ दशलक्ष पिंप कच्चे तेल भारत रशियाकडून विकत घेतो.

logo
marathi.freepressjournal.in