भारत-रशिया संबंध दृढ आणि वास्तववादी; सर्गेई लावरोव्ह यांच्या भेटीनंतर जयशंकर यांचे प्रतिपादन

जयशंकर आणि लावरोव्ह यांनी उभय देशांत २०२४ ते २०२८ या कालावधीसाठी सल्लामसलतीच्या करारावर स्वाक्षरी केली.
भारत-रशिया संबंध दृढ आणि वास्तववादी;
सर्गेई लावरोव्ह यांच्या भेटीनंतर जयशंकर यांचे प्रतिपादन
PM

मॉस्को : भारत-रशिया संबंध भू-राजकीय वास्तववाद, समविचारी सामरिक धोरण आणि परस्पर हित यावर आधारीत आहेत. गेल्या काही वर्षांत ते अधिक दृढ बनत चालले आहेत, असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले. जयशंकर सध्या पाच दिवसांच्या रशिया दौऱ्यावर गेले असून बुधवारी त्यांनी मॉस्को येथे रशियन परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर जयशंकर यांनी हे मत व्यक्त केले.

जयशंकर आणि लावरोव्ह यांनी उभय देशांत २०२४ ते २०२८ या कालावधीसाठी सल्लामसलतीच्या करारावर स्वाक्षरी केली. तसेच द्विपक्षीय संबंध, आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि समकालीन समस्यांवर विस्तृत चर्चा केली. त्यात हिंद-प्रशांत महासागर क्षेत्र, युक्रेन संघर्ष, गाझा परिस्थिती, अफगाणिस्तान आणि मध्य आशिया, ब्रिक्स संघटना, शांघाय सहकार्य संघटना, जी-२० आणि संयुक्त राष्ट्रे या विषयांवरही विचार विनिमय केला. त्यांनी द्विपक्षीय आर्थिक सहकार्य, ऊर्जा व्यापार, दूरसंपर्काचे प्रयत्न, लष्करी-तांत्रिक सहकार्य आणि नागरिकांमधील देवाणघेवाण यातील प्रगतीची नोंद घेतली. दोन्ही देशांच्या प्रतिनिधींना ही भेट सकारात्मक झाल्याचे सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in