तालिबानशी ‘व्यावहारिक संवाद’ ठेवण्याचा भारताचा आग्रह

भारताचा पाकिस्तानवर आरोप अफगाणिस्तानसारख्या संकटातून सावरू पाहणाऱ्या देशासाठी प्रवेश बंद करून पाकिस्तानने त्या देशाच्या जनतेविरुद्ध ‘व्यापार आणि ट्रान्झिट दहशतवाद’ केल्याचा आरोप करीत भारताने त्याचा जोरदार निषेध केला आहे.
तालिबानशी ‘व्यावहारिक संवाद’ ठेवण्याचा भारताचा आग्रह
Published on

न्यूयॉर्क : तालिबानशी व्यवहार करताना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने व्यावहारिक आणि संतुलित दृष्टिकोन अवलंबावा, असे सांगत भारताने केवळ दंडात्मक कारवाईवर अवलंबून न राहता सकारात्मक पावले उचलण्यासाठी प्रोत्साहन देणारे संवाद-केंद्रित धोरण आवश्यक असल्याचे मत मांडले आहे.

भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी राजदूत हरीश पर्वथनेनी यांनी अफगाणिस्तान स्थितीवरील संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत हे निवेदन केले. स्लोव्हेनियाने परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल पर्वथनेनी यांनी त्यांचे अभिनंदन केले. भारताचे अफगाणिस्तानशी असलेले संबंध हे प्राचीन सांस्कृतिक नात्यांमध्ये रुजलेले असून तेच भारताच्या दृष्टीकोनाला दिशा देत राहतात, असेही त्यांनी सांगितले.

भारताचा पाकिस्तानवर आरोप अफगाणिस्तानसारख्या संकटातून सावरू पाहणाऱ्या देशासाठी प्रवेश बंद करून पाकिस्तानने त्या देशाच्या जनतेविरुद्ध ‘व्यापार आणि ट्रान्झिट दहशतवाद’ केल्याचा आरोप करीत भारताने त्याचा जोरदार निषेध केला आहे. भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी पी. हरीश यांनी सुरक्षा परिषदेला बुधवारी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in