मालदीवमधून सैनिक परतले, त्यांच्या जागी भारतीय नागरी कर्मचारी दाखल झाले

मालदीवमध्ये तैनात असलेल्या भारतीय सैनिकांची जागा घेण्यासाठी नागरी कर्मचारी दाखल झाले आहेत.
मालदीवमधून सैनिक परतले, त्यांच्या जागी भारतीय नागरी कर्मचारी दाखल झाले

माले : मालदीवमध्ये तैनात असलेल्या भारतीय सैनिकांची जागा घेण्यासाठी नागरी कर्मचारी दाखल झाले आहेत. मालदीवच्या अध्यक्षांनी भारतीय सैनिकांना परत पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही कृती करण्यात आली आहे.

मालदीव हिंदी महासागरातील सागरी वाहतूक मार्गांजवळ मोक्याच्या ठिकाणी वसले असल्याने भारताने तेथे ८८ सैनिक, दोन हेलिकॉप्टर आणि एक डॉर्निअर गस्ती विमान तैनात केले होते. मालदीवमध्ये काही महिन्यांपूर्वी निवडून आलेले अध्यक्ष मोहम्मद मुईझू यांनी त्याला आक्षेप घेत भारतीय सैनिकांना परत पाठवण्याची मागणी केली होती. त्यासाठी १० मार्चची मुदत दिली होती. भारताने त्यावर मार्ग काढण्यासाठी वाटाघाटी चालवल्या होत्या. दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये २ फेब्रुवारी रोजी झालेल्या चर्चेत दोन हेलिकॉप्टर आणि एका विमानाचे काम सुरू ठेवण्यावर सहमती झाली होती. मात्र, ती चालवण्यासाठी सेनादलांतील अधिकाऱ्यांऐवजी नागरी सेवेतील कर्मचारी ठेवले जावेत, असे ठरले होते. त्यानुसार भारतीय नागरी कर्मचारी बुधवारी मालदीवमध्ये पोहोचले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in