अमेरिकेत भारतीय कुटुंबाचा मृत्यू शरीरावर बंदुकीच्या गोळ्यांच्या जखमा

नेमकी आत्महत्या केली की त्यांचा खून झाला, याबाबतचे गूढ वाढले आहे
अमेरिकेत भारतीय कुटुंबाचा मृत्यू  शरीरावर बंदुकीच्या गोळ्यांच्या जखमा

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या मेरीलँड राज्यात भारतीय कुटुंबाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मृतांमध्ये पती, पत्नीसह सहा वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. तिघांच्याही शरीरावर बंदुकीच्या गोळ्यांच्या जखमा असल्याने घटनेबाबतचे गूढ वाढले आहे.

अमेरिकेच्या मेरीलँड राज्यातील बाल्टिमोर काऊंटी येथे एका घरात शनिवारी भारतीय कुटुंब मृतावस्थेत आढळून आले. हे कुटुंब मूळचे कर्नाटकमधील असून, योगेश एच. नागरजप्पा (वय ३७), प्रतिभा वाय. अमरनाथ (वय ३७) आणि यश होन्नाळ (वय ६) अशी मृतांची नावे आहेत. या तिघांच्याही शरीरावर बंदुकीच्या गोळ्यांच्या जखमा आहेत. त्यामुळे त्यांनी नेमकी आत्महत्या केली की त्यांचा खून झाला, याबाबतचे गूढ वाढले आहे. बाल्टिमोर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. स्थानिक प्रशासनाने घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in