युरोपात भारतीय प्रवासी अडकले

इटलीत विमानतळ कर्मचाऱ्यांचा संप
युरोपात भारतीय प्रवासी अडकले

मिलान : उन्हाळाच्या सुट्टीसाठी युरोपात गेलेले हजारो भारतीय इटलीच्या अनेक विमानतळावर अडकून पडलेले आहेत. इटलीच्या विमानतळ कर्मचाऱ्यांनी व वैमानिक संपावर गेले आहेत. त्यामुळे इटलीच्या विविध विमानतळावरून भारतात येणारी अनेक उड्डाणे रद्द केली आहेत. त्यामुळे प्रवाशांना इटलीच्या विमानतळांवर रात्र काढावी लागली.

या भारतीय प्रवाशांना विमान कंपन्यांकडून विमानाला झालेल्या उड्डाणाप्रकरणी कोणतीही नुकसानभरपाई दिली नाही. केवळ पाण्याची बाटली व दीड हजार रुपये दिले जात आहेत. या गोंधळात भारतात येणाऱ्या अनेक प्रवाशांची कनेक्टिंग विमाने रद्द झाली किंवा सुटली आहेत. इटलीतील संपामुळे युरोपातील उड्डाणांवर परिणाम झाला आहे.

इटलीतील रेल्वे कर्मचाऱ्यांपाठोपाठ विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. त्यामुळे युरोपातून जगाच्या विविध भागात जाणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दिल्लीतील मनीष यांचे विमान व्हेनिस ते फ्रँकफर्टला जाणार होते. त्यानंतर ते फ्रँकफर्ट ते दिल्ली असा प्रवास करणार होते. संपामुळे मी व्हेनिस ते फ्रँकफर्ट प्रवास करू शकलो नाही. पुढील विमान कधी मिळणार याची माहिती विमान कंपनीकडून दिली जात नाही.

logo
marathi.freepressjournal.in