
जगात पर्यावरण निर्देशांकात भारताने आजवरची सर्वात खराब कामगिरी केली आहे. भारताच्या जोडीला चीनही आहे. अमेरिकन पर्यावरण संस्थेने पर्यावरण प्रदर्शनाच्या आधारावर केलेल्या १८० देशांच्या यादीत भारत सर्वात खाली आहे.
येल सेंटर फॉर एनव्हारमेंटल लॉ अड पॉलिसी व कोलंबिया विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरनॅशनल अर्थ सायन्स इन्फॉर्मेशन नेटवर्कने ‘पर्यावरण कामगिरी निर्देशांक’ जाहीर केला. यात डेन्मार्क, ब्रिटन, फिनलंड हे देश सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. तर खराब हवेचा सर्वात प्रदूषित स्तर, वाढता ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन वाढत असल्याने भारत हा सर्वात खालच्या क्रमांकावर आहे.
हा निर्देशांक बनवताना ४० इंडिकेटर्स बनवले आहेत. या इंडिकेटर्सच्या माध्यमातून कोणता देश पर्यावरणाच्या लक्ष्यापासून किती दूर आहे हे कळते. या निर्देशांकात भारत १८.९ , म्यानमार १९.४, व्हिएटनाम २०.१, बांगलादेश २३.१, पाकिस्तान २४.६ गुण मिळाले आहेत.
या निर्देशांकात खराब रँकिंग याचा अर्थ या देशांनी पर्यावरणापेक्षा आर्थिक विकासाला अधिक महत्व दिले आहे. चीन २८.४ टक्के मिळवून १६१ व्या स्थानकावर आहे. तर अमेरिका ४२ व्या क्रमांकावर आहे. ट्रम्प यांच्या काळात पर्यावरण संरक्षणाबाबत दुर्लक्ष केल्याप्रकरणी अमेरिकेचे रँकिंग घसरले आहे. रशियाचा या यादीत ११२ वा क्रमांक आहे.
२०५० पर्यंत चीन सर्वाधिक प्रदूषण करेल
२०५० पर्यंत चीन हा जगात सर्वात जास्त ग्रीन हाऊस गॅस सोडेल. तर भारत हा ग्रीन हाऊस सोडणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाचा देश असेल. या देशांनी प्रदूषण कमी करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, भविष्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. ग्रीन हाऊस सोडण्यात चीन, भारत, अमेरिका व रशिया हे आघाडीवर असतील, असे या अहवालात नमूद केले आहे.