पाकव्याप्त काश्मीरमध्ये महागाईविरोधात तीव्र आंदोलन; एक पोलीस ठार, १०० नागरिक जखमी

पाकव्याप्त काश्मीरमध्ये गव्हाचे पीठ आणि विजेच्या वाढत्या किमतींविरोधात आंदोलन करणारे नागरिक आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या हिंसक चकमकीत एक पोलीस अधिकारी ठार झाला आणि १०० हून अधिक लोक जखमी झाले
पाकव्याप्त काश्मीरमध्ये महागाईविरोधात तीव्र आंदोलन; एक पोलीस ठार, १०० नागरिक जखमी

इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मीरमध्ये गव्हाचे पीठ आणि विजेच्या वाढत्या किमतींविरोधात आंदोलन करणारे नागरिक आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या हिंसक चकमकीत एक पोलीस अधिकारी ठार झाला आणि १०० हून अधिक लोक जखमी झाले. पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी सोमवारी या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे.पाकव्याप्त काश्मीरमध्ये रविवारी पोलीस आणि मानवाधिकार चळवळीतील कार्यकर्ते यांच्यात चकमक झाली आणि संपूर्ण प्रदेशात बंद पाळण्यात आला. मीरपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक कामरान अली यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, इस्लामगढ शहरात उपनिरीक्षक अदनान कुरेशी यांचा छातीत गोळी लागल्याने मृत्यू झाला. तिथे ते मुझफ्फराबादमार्गे येणारी रॅली थांबवण्यासाठी इतर पोलीस कर्मचाऱ्यांसह तैनात होते. निदर्शने थांबवण्यासाठी प्रादेशिक सरकारने रेंजर्स आणि पोलिसांचा मोठा ताफा मागवला आहे.

मोबाईल, इंटरनेट सेवा बंद

भीमबेर आणि बाग शहरांसह पीओकेच्या विविध भागांमध्ये रविवारी मोबाइल फोन आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या. पीओकेची राजधानी मुझफ्फराबादच्या विविध भागात पोलीस आणि आंदोलकांमध्ये हिंसक चकमक झाली. आंदोलकांनी दगड आणि बाटल्या फेकल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करत गोळीबारही केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in