Iran vs US-Israel War : रडारपासूनही अदृश्य राहणारे अमेरिकेचे एफ-३५ जेट फायटर इराणने उडविले

जगातील सर्वात महाग, शक्तिशाली आणि रडार यंत्रणेपासूनही अदृश्य राहणाऱ्या एफ-३५ या फायटर जेटवर अचूक हल्ला करून त्या विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचा दावा इराणने केल्याने अमेरिकेसह जगभरातील संरक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.
Iran vs US-Israel War : रडारपासूनही अदृश्य राहणारे अमेरिकेचे एफ-३५ जेट फायटर इराणने उडविले
Published on

तेहरान : जगातील सर्वात महाग, शक्तिशाली आणि रडार यंत्रणेपासूनही अदृश्य राहणाऱ्या एफ-३५ या फायटर जेटवर अचूक हल्ला करून त्या विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचा दावा इराणने केल्याने अमेरिकेसह जगभरातील संरक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.

इराणच्या इस्लामिक गार्ड्स कॉप्सनुसार (आयआरजीसी) या फायटर जेटला इराणच्या हवाई हद्दीत एअर डिफेन्स सिस्टिमने हिट केले. आयआरजीसीच्या दाव्यानुसार त्यांनी १२५ पेक्षा जास्त अमेरिकी आणि इस्रायली ड्रोन रोखल्यानंतर हा हल्ला केला.

इराणच्या मीडियानुसार या हल्ल्यासाठी इराणने स्वदेशी 'बावर-३७३' एअर डिफेन्स सिस्टिमचा वापर केला. यात पॅसिव्ह सेन्सरचासुद्धा हात असू शकतो. रडार सिग्नलशिवाय हे सेन्सर विमानाला शोधू शकतात. इराणने या हल्ल्याचा व्हिडीओ जारी केला आहे. यात विमानाला मिसाइल हिट करत असल्याचा दावा करण्यात आला. अमेरिकेने अद्याप याची अधिकृत पुष्टी केलेली नाही. एफ-३५चे इमर्जन्सी लँडिंग का झाले, यामागे काही तांत्रिक कारण आहे का, ते अद्याप समजू शकलेले नाही.

एफ-३५ चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते स्टेल्थ आहे. हवेत उडताना अदृश्य असते. हे विमान एअर टू एअर डॉगफाईट, एअर टू ग्राऊंड बॉम्बफेक आणि हेरगिरी ही तिन्ही काम करू शकते, ध्वनीच्या वेगापेक्षाही जास्त गतीने १९३१ किमी / प्रतितास वेगाने हे विमान उडू शकते. यामध्ये अॅडव्हान्स सेन्सर सूट आणि रडार सिस्टिम आहे, ज्यामुळे पायलट ३६० डिग्री व्ह्यू पाहू शकतो.

मिशनवर असताना एफ-३५ फायटर जेटला इमर्जन्सी लँडिंग करावे लागले हे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने मान्य केले. विमानाने सुरक्षित लैंडिंग केले असून पायलटची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. एफ-३५ बाबत इराण जो दावा करतेय तसे खरच घडले असेल तर अमेरिकेसाठी हा मोठा धक्का आहे कारण अमेरिकेकडून या विमानाचे मोठ्या प्रमाणात मार्केटिंग सुरू आहे.

युद्धाच्या दरम्यान, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉप्सने म्हटले आहे की त्यांनी अमेरिकेच्या एफ-३५ फायटर जेटवर हल्ला करून त्याला नुकसान पोहोचवले. आयआरजीसीने या हल्ल्याचा व्हिडीओही जारी केला आहे, ज्यात जेटला लक्ष्य करताना दाखवले आहे. मात्र, या व्हिडीओबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने कबूल केले की एका एफ-३५ जेटला इराणच्या वर मोहिमेदरम्यान आपत्कालीन लँडिंग करावी लागली. विमानाला मध्य-पूर्वेतील एका देशात उतरवण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in