इराणचा कुवेतवर हल्ला; शांतता चर्चा थांबवण्याची धमकी

अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने रविवारी बहरीन आणि कुवेतवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागून हल्ले केले आहेत. तसेच, वॉशिंग्टनने हे हल्ले सुरू ठेवल्यास युद्ध थांबवण्यासाठी सुरू असलेल्या वाटाघाटी पूर्णपणे बंद करण्याची धमकी इराणने दिली आहे.
इराणचा कुवेतवर हल्ला; शांतता चर्चा थांबवण्याची धमकी
इराणचा कुवेतवर हल्ला; शांतता चर्चा थांबवण्याची धमकी
Published on

दुबई : अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने रविवारी बहरीन आणि कुवेतवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागून हल्ले केले आहेत. तसेच, वॉशिंग्टनने हे हल्ले सुरू ठेवल्यास युद्ध थांबवण्यासाठी सुरू असलेल्या वाटाघाटी पूर्णपणे बंद करण्याची धमकी इराणने दिली आहे.

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर रविवारी सकाळी कुवेत आणि बहरीनवर इराणने हल्ले केले. कुवेतच्या लष्कराने सांगितले की, त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेने इराणची दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली. यात कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झालेले नाही.

बहरीनच्या गृह मंत्रालयाने सांगितले की, इराणच्या हल्ल्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील एका निवासी इमारतीचे नुकसान झाले आहे, मात्र सुदैवाने कोणीही मृत्युमुखी पडले नाही. बहरीनमध्ये अमेरिकन नौदलाचा ५ वा ताफा तैनात आहे. बहरीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणच्या या कारवाईचा तीव्र निषेध करत, हा इराणचा पद्धतशीर आक्रमकपणा असल्याचे म्हटले आहे.

ट्रम्प यांचा इशारा अमेरिकेच्या केंद्रीय कमांडने रविवारी इराणची लष्करी पायाभूत सुविधा, रडार यंत्रणा आणि ड्रोन साठवणूक केंद्रे उद्ध्वस्त केल्याची माहिती दिली. शनिवारी इराणने कतारच्या मालवाहू जहाजावर हल्ला केल्यामुळे अमेरिकेने ही कारवाई केली. यावर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर प्रतिक्रिया देताना, इराणने युद्धविराम कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आणि त्यांना गंभीर परिणामांची चेतावणी दिली. लेबनॉनमधील संघर्षाची धग कायम इराणचा असा आग्रह आहे की, युद्धविरामामध्ये लेबनॉनमधील लढाई थांबणे देखील समाविष्ट असावे. लेबनॉनमध्ये इराण-समर्थित हिजबुल्ला गट आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष सुरूच आहे. इस्रायलने दक्षिण लेबनॉनच्या मोठ्या भागावर ताबा मिळवला असून, हिजबुल्लाचे निरस्त्रीकरण झाल्याशिवाय सैन्य मागे घेण्यास नकार दिला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in