खामेनींच्या अंत्यसंस्काराचे मोदींना निमंत्रण

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या शासकीय अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी निमंत्रण पाठवले आहे.
खामेनींच्या अंत्यसंस्काराचे मोदींना निमंत्रण
Published on

तेहरान/नवी दिल्ली : इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या शासकीय अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी निमंत्रण पाठवले आहे. अयातुल्ला खामेनी यांचा २८ फेब्रुवारी रोजी इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर ४ मार्च रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार होते, परंतु युद्धाच्या कारणामुळे ते पुढे ढकलण्यात आले होते.

आता याची सुरुवात ४ जुलैपासून होईल. त्यांचे पार्थिव तेहरानमधील ग्रँड मोसल्ला परिसरात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर ९ जुलै रोजी मशहद येथील इमाम रझा दर्ग्यात त्यांना दफन करण्यात येईल. तेहरान, कुम आणि मशहद येथे होणाऱ्या अंत्यसंस्कार कार्यक्रमांमध्ये सुमारे २ कोटी लोक सहभागी होतील अशी शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

logo
marathi.freepressjournal.in