Iran vs US-Israel War : युद्ध संपवण्यासाठी इराणचा नवा प्रस्ताव

इराणने अमेरिका आणि इस्रायलसोबतचे युद्ध संपवण्यासाठी एक नवा प्रस्ताव सादर केला आहे.
Iran vs US-Israel War : युद्ध संपवण्यासाठी इराणचा नवा प्रस्ताव
Iran vs US-Israel War : युद्ध संपवण्यासाठी इराणचा नवा प्रस्ताव
Published on

दुबई : इराणने अमेरिका आणि इस्रायलसोबतचे युद्ध संपवण्यासाठी एक नवा प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, अमेरिकन शिष्टमंडळाने आपला पाकिस्तान दौरा रद्द केल्यामुळे, युद्ध संपण्याची आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' पुन्हा खुली होण्याची शक्यता तूर्तास धूसर दिसत आहे. इराणने 'हॉर्मुझच्या सामुद्रधुनी'वरील आपला ताबा सोडण्याची तयारी दर्शवली असून, त्याबदल्यात अमेरिकेने इराणवरील आर्थिक नाकेबंदी उठवावी आणि सुरू असलेले युद्ध कायमचे थांबवावे, असा प्रस्ताव दिला आहे. त्याचप्रमाणे इराणच्या नव्या प्रस्तावात अणू कार्यक्रमावरील चर्चा भविष्यासाठी पुढे ढकलण्याचेही सुचवण्यात आले आहे.

Iran vs US-Israel War : युद्ध संपवण्यासाठी इराणचा नवा प्रस्ताव
होर्मुझमध्ये अडथळा आणणाऱ्या इराणच्या बोटी उडवा; डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकी नौदलाला आदेश

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हा प्रस्ताव फेटाळण्याची दाट शक्यता आहे. कारण, ज्या मुख्य मुद्द्यावरून २८ फेब्रुवारी रोजी अमेरिकेने बॉम्बफेक सुरू केली होती (म्हणजेच इराणला अण्वस्त्र निर्मितीपासून रोखणे) त्याचा या प्रस्तावात कुठेही उल्लेख नाही. तसेच इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि प्रादेशिक प्रॉक्सी गटांना मिळणारा पाठिंबा यावरही हा प्रस्ताव मौन बाळगून आहे.

८ एप्रिलपासून लागू झालेला सध्याचा तात्पुरता युद्धविराम ट्रम्प यांनी अनिश्चित काळासाठी वाढवला आहे. पाकिस्तानच्या मध्यस्थीने इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांना चर्चेसाठी एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र या आठवड्यात अमेरिकेने माघार घेतल्याने चर्चेची आशा मावळली आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. वॅन्स यांनी यापूर्वी चर्चेच्या एका फेरीत सहभाग घेतला होता, मात्र ती निष्फळ ठरली होती. महत्त्वाचे म्हणजे, मंगळवारी ट्रम्प यांनी इराणसोबतचा दोन आठवड्यांचा युद्धविराम अनिश्चित काळासाठी वाढवला आहे, जेणेकरून तेहरानला शांततेचा प्रस्ताव तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.

एककीकडे चर्चा ठप्प असताना दुसरीकडे अमेरिकेने मध्यपूर्वेत आपले लष्करी बळ प्रचंड वाढवले आहे. सध्या या भागात अमेरिकेच्या तीन विमानवाहू युद्धनौका यूएसएस अब्राहम लिंकन, यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड आणि यूएसएस जॉर्ज एचडब्ल्यू बुश तैनात आहेत. या ताफ्यात १५,००० हून अधिक सैनिक आणि २०० हून अधिक लढाऊ विमाने सज्ज आहेत. इराणचे परराष्ट्र मंत्री सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. इराणकडील समृद्ध युरेनियमचा साठा काढून घेण्याबाबत रशिया मदत करू शकतो, अशी चर्चा आहे. मात्र, इराणने आपला अणू साठा सोपवण्यास अद्याप नकार दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in